News Flash

घाऊक किंमत निर्देशांकात घसरण

तांदूळ, गहू, डाळी, बटाटेसारख्या खाद्य वस्तूंच्या किंमती वधारत्या राहूनही डिसेंबरमधील घाऊक किंमत निर्देशांक काहीसा घसरून ७.१८ टक्क्यांवर आला आहे. पतधोरण निर्नायकीसाठी मध्यवर्ती बँकेला हा दर

| January 15, 2013 12:16 pm

तांदूळ, गहू, डाळी, बटाटेसारख्या खाद्य वस्तूंच्या किंमती वधारत्या राहूनही डिसेंबरमधील घाऊक किंमत निर्देशांक काहीसा घसरून ७.१८ टक्क्यांवर आला आहे. पतधोरण निर्नायकीसाठी मध्यवर्ती बँकेला हा दर ५ ते ६ टक्के असणे आवश्यक आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे तिमाही पतधोरण २९ जानेवारी रोजी जाहिर होत आहे. सध्या रेपो दर ८ तर रिव्हर्स रेपो दर ७ टक्के आहे. वाढती महागाई ही चिंतेची बाब मानूनच रिझव्‍‌र्ह बँकेने एप्रिल २०१२ पासून प्रमुख व्याजदर कमी केलेले नाहीत. परिणामी नोव्हेंबरमधील शून्याच्याही खालचे औद्योगिक उत्पादन आणि अनपेक्षित ८ टक्के सकल राष्ट्रीय उत्पादनही दुर्लक्षिले गेले आहे. दरम्यान, सलग तिसऱ्या महिन्यात किरकोळ महागाईचा दर वधारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 12:16 pm

Web Title: wholeprise sensex fallen down
Next Stories
1 अनपेक्षित ‘इन्फी’!
2 काळी मिरीच्या सौद्यातील वितरणात ‘काळेबेरे’
3 मार्केट मंत्र.. : ‘इन्फी’ने भाव खाल्ला!
Just Now!
X