24 October 2020

News Flash

घाऊक महागाई दराचाही भडका

जानेवारीत ३.१० टक्के; १० महिन्यांतील उच्चांकाची नोंद

| February 15, 2020 05:01 am

जानेवारीत ३.१० टक्के; १० महिन्यांतील उच्चांकाची नोंद * कांद्यातील २९३ टक्के भाववाढीचा परिणाम

नवी दिल्ली : मुख्यत: भडकलेले कांदे-बटाटय़ाचे दर आणि इतर अन्नधान्यांच्या किमतींचा परिणाम सरलेल्या जानेवारीमधील घाऊक किमतीवर आधारित महागाई निर्देशांक ३.१० टक्के असा १० महिन्यांच्या उच्चांक स्तरावर नोंदला गेला आहे. यापूर्वीचा या महागाई निर्देशांकाचा सर्वोच्च स्तर एप्रिल २०१९ मध्ये ३.१८ टक्के असा नोंदला गेला आहे.

आधीच्या डिसेंबर २०१९ मध्ये घाऊक महागाई निर्देशांक २.५९ टक्के, तर वर्षभरापूर्वी जानेवारी २०१९ मध्ये तो २.७६ टक्के असा होता, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी दर्शविते. वार्षिक तुलनेत कांद्याचे दर जवळपास तीन पट म्हणजे २९३ टक्क्य़ांनी कडाडले आहेत, त्या खालोखाल बटाटे ८७.८४ टक्के तर अन्य भाज्यांचे दरही ५७.७२ टक्क्य़ांनी वाढल्याचा एकंदर महागाई निर्देशांकात वाढीत परिणाम दिसूून आला आहे. त्या उलट उत्पादित खाद्यपदार्थामध्ये डिसेंबरमधील वाढ ०.३४ टक्के, इंधन व ऊर्जा वर्गवारीतील वाढ ही ३.४२ टक्के अशी राहिली आहे.

महागाई दरात आगामी काही महिन्यांत आणखी वाढ होण्याचे संकेत इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर यांनी दिले आहेत. वाढलेल्या आयात शुल्कामुळे महत्त्वाच्या आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती महागणार आहेत. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जोखीम भावना बळावणार असली तरी खनिज तेलाच्या किमती तूर्त थंडावत असल्याचे दिसत आहे. परिणामी फेब्रुवारी महिन्याचे महागाई दराच्या आकडय़ात काहीशी सुधारणा अपेक्षित येईल. मात्र ती तात्पुरतीच असेल. खाद्य तेल त्याचप्रमाणे दुग्धजन्य उत्पादनांमधील किंमत वाढ पुढील काही महिने सुरूच राहणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

यापूर्वी जाहीर झालेल्या किरकोळ किमतींवर आधारित महागाई दराच्या आकडय़ांनी ६८ महिने म्हणजे जवळपास सात वर्षांपूर्वी मागे टाकलेला ७.५९ टक्के उच्चांक स्तराला यंदाच्या जानेवारीत गवसणी घातल्याचे तीनच दिवसांपूर्वी स्पष्ट झाले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या दृष्टीने समाधानकारक २ ते ६ टक्के या पातळीच्या तुलनेत सध्याचा महागाईचा स्तर भयानक वाढ एकंदरीत मंदावलेल्या अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक संकेत मानला जात आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने या स्थितीची दखल घेत, फेब्रुवारीच्या प्रारंभी पतधोरण आढावा घेताना व्याजाचे दर जैसे थे स्थितीत ठेवण्याचेच धोरण अनुसरले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 3:27 am

Web Title: wholesale inflation surges to 8 month high zws 70
Next Stories
1 थकबाकी फेडण्यासाठी कुठल्याही दूरसंचार कंपनीकडून कर्जमागणी नाही – स्टेट बँक
2 बाजार-साप्ताहिकी : सावध पावले
3 देशाच्या निर्यातीला ‘करोना’चा संसर्ग
Just Now!
X