नवीन विंडोज् ८ कार्यप्रणालीने समर्थ ‘ल्युमिया’ स्मार्ट फोनची संपूर्ण (ल्युमिया ९२०, ल्युमिया ८२० आणि ल्युमिया ६२०) गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत नोकिया इंडियाचे संचालक (विक्री) व्ही. रामनाथ आणि उत्पादन प्रमुख सिद्धार्थ वर्मा यांनी दाखल केली.
नोकिया ल्युमिया ९२०ची वैशिष्टय़े
*  उत्तम स्पर्श संवेदना असलेली आणि रंगांचे प्रभावी प्रदर्शन करणारी ४.५ इंचाची रुंद स्क्रीन
*  नोकिया ड्राइव्ह आणि तब्बल लाखभर गाण्यांची पोतडी असलेले नोकिया म्युजिक अ‍ॅप मोफत.
*  ऑटोफोकस, एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सेल कॅमेरा
*  नवीन ‘विंडोज् ८’ कार्यप्रणाली, १ जीबी रॅम, ३२ जीबी अंगभूत मेमरी
*  सुमारे१८० ग्रॅम वजन, थ्रीजी वापरातूननही १३ ते १४ तास चालणारी बॅटरी
*  कमाल विक्री किंमत : ३८,२००‘एसीजी