08 March 2021

News Flash

विप्रोमध्ये १००० कर्मचारयांची भरती

आयटी क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी विप्रो जर्मनीमधील आपल्या कर्मचारी संख्येमध्ये तिपटीने वाढ करणार आहे. पुढील तीन वर्षांमध्ये कंपनी १००० कर्मचाऱयांची भरती करण्यात येणार आहे. जर्मनीमध्ये आपले

| June 12, 2013 05:03 am

आयटी क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी विप्रो जर्मनीमधील आपल्या कर्मचारी संख्येमध्ये तिपटीने वाढ करणार आहे. पुढील तीन वर्षांमध्ये कंपनी १००० कर्मचाऱयांची भरती करण्यात येणार आहे. जर्मनीमध्ये आपले कार्यक्षेत्र विकसित करण्याचा कंपनीचा मानस आहे.
आयटी क्षेत्रातील जर्मनीचा वाटा मोठा असून, या क्षेत्रातील जर्मनीची मागील वर्षीची उलाढाल ८० अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती.
सध्या विप्रोचे जर्मनीत ५०० कामगार असून, ३० प्रकल्पांसाठी कंपनी काम करते. या प्रकल्पांचे जगातील ९० देशांमध्ये १,४५,००० कर्मचारी आहेत. जर्मनीमधील ग्लोबल ऑटोमोटिव्ह कंपनी सारख्या महाकाय कंपन्या विप्रोच्या ग्राहक कंपन्या आहेत. “किरकोळ क्षेत्रामध्ये, ऑटोमोटिव्ह, टेलिकॉम, हेल्थकेअर, बॅंकिंग आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये येत्या वर्षभरात कंपनीला काम वाढवायचे आहे.” असे कंपनीचे अधिकारी रजत माथूर म्हणाले.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2013 5:03 am

Web Title: wipro to hire over 1000 professionals
टॅग : Business News,Wipro
Next Stories
1 अवमूल्यन
2 राज्यातील ५५ हजार औषध विक्रेते व्यवसाय गुंडाळून परवाने परत करणार!
3 ‘कोब्रा’डंख
Just Now!
X