फ्रेंच वाहननिर्मात्या प्युजोने आपल्या महत्त्वाकांक्षी एअर-पॉवर्ड हायब्रिड कारच्या प्रकल्पाला अखेर मूत रूप दिले असून, २०१६ पासून या बहुतांश हवेवर चालणाऱ्या संकरित मोटारी रस्त्यावर धावताना दिसतील. सध्याच्या तुलनेत इंधन खर्चात सरसकट ४५ टक्क्यांची बचत या मोटारींद्वारे होईल, असा कंपनीचा दावा आहे. सध्या वापरात असलेल्या मोटारींच्या तुलनेत पृथ्वीच्या पोटातील जीवाश्म इंधनाच्या वापराला पर्याय देणाऱ्या परिणामी नैसर्गिक स्रोतांचा नाश व प्रदूषणाच्या समस्येवरही उतारा असलेल्या या संकरित मोटारी खरे तर वसुंधरेच्या तारणहारच ठराव्यात.