News Flash

खासगीकरणाविरुद्ध कामगारांचे आज आंदोलन

बुधवारच्या या आंदोलनात आघाडीच्या १० कामगार संघटना, त्यांचे ज्येष्ठ प्रतिनिधी, सदस्य सहभागी होत असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

नव्या अर्थसंकल्पातील तरतुदीद्वारे खासगीकरण जाहीर करणाऱ्या सरकारच्या धोरणाविरुद्ध बुधवारी, ३ फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा कामगार संघटनांनी केली आहे. बुधवारच्या या आंदोलनात आघाडीच्या १० कामगार संघटना, त्यांचे ज्येष्ठ प्रतिनिधी, सदस्य सहभागी होत असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

इंटक, आयटक, हिंद मजदूर सभा, सिटू, एआययूटीयूसी, टीयूसीसी, सेवा, एआयसीसीटीयू, एलपीएफ व यूटीयूसी या १० संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे.

सरकारची अर्थसंकल्पीय धोरणे कामगारविरोधी असल्याचा आरोप करत बुधवारच्या आंदोलनात सहभागी होत असल्याचे संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी एक प्रसिद्धी पत्रक काढून स्पष्ट केले.

वित्त वर्ष २०२१-२२चा अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन राष्ट्रीयीकृत बँका तसेच एक सर्वसाधारण विमा कंपनीचे खासगीकरण करण्याचे जाहीर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2021 12:14 am

Web Title: workers agitation against privatization today abn 97
टॅग : Budget 2021
Next Stories
1 नव्या सौरऊर्जा प्रकल्पांचा दरही वाढणार
2 “हा देशाचा अर्थसंकल्प आहे की OLX ची जाहिरात?, यांना शक्य झालं तर…”; खासगीकरणावरुन मोदी सरकारवर निशाणा
3 Share Market : वाढता वाढता वाढे… बजेटच्या दुसऱ्या दिवशी दोन दशकांनंतर पहिल्यांदाच असं घडलं…
Just Now!
X