News Flash

संपाचा परिणाम शून्य; मुंबईत स्टेट बँकेच्या शाखांमध्ये नियमित व्यवहार

खासगी, सहकारी व क्षेत्रीय ग्रामीण बँकांचेही नेहमीप्रमाणेच व्यवहार झाले.

सार्वजनिक क्षेत्रातील सहयोगी पाच बँकांचे स्टेट बँकेतील विलीनीकरणाचा देशभरातील बँक, अधिकाऱ्यांनी शुक्रवारचा एक दिवसाचा संप घडवून निषेध केला. ज्या बँकेला केंद्रस्थानी ठेवून हा संप पुकारण्यात आला, त्या स्टेट बँकेच्या शाखा मात्र शुक्रवारी सुरू होत्या. तसेच खासगी, सहकारी व क्षेत्रीय ग्रामीण बँकांचेही नेहमीप्रमाणेच व्यवहार झाले.

‘स्टेट सेक्टर बँक एम्प्लॉइज असोसिएशन’ (एसएसबीईए) च्या नेतृत्वाखाली मुख्य स्टेट बँकेच्या – स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅण्ड जयपूर व स्टेट बँक ऑफ पटियाळा या सहयोगी बँकांचे विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याबाबत पाच सहयोगी बँकांमध्ये एकतर्फी सेवाशर्ती लादत असल्याचा आरोप करत हे बँक कर्मचारी संघटना ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ व बँक व्यवस्थापन संघटना ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ यांच्या दरम्यानच्या कराराचे उल्लंघन असल्याचा दावाही संपकरी संघटनेने केला आहे.

शुक्रवारच्या संपानंतरही शनिवार (महिन्यातील दुसरा शनिवार) व रविवारची सुटी आल्याने सहयोगी बँकांमधील व्यवहारांवर विपरीत परिणाम होत आहे. मुख्य स्टेट बँकेच्या व्यवहार शुक्रवारी सुरू राहिल्याने त्याचा अधिक परिणाम जाणवला नाही. या संपात ३.५० लाख कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.

संपामुळे मुंबईचा समावेश असलेल्या देशाच्या पश्चिम भागात ७,००० कोटी रुपयांच्या ७ लाख धनादेश वटणावळीचे व्यवहार होऊ शकले नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. तर दक्षिण (५,००० कोटी रुपयांचे ६ लाख धनादेश) व उत्तर भागातील (४,००० कोटी रुपयांचे ५ लाख धनादेश) मिळून देशभरात १६,००० कोटी रुपयांचे २१ लाख धनादेश रखडल्याचेही सांगण्यात येते.

देशाच्या मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, भोपाळ, त्रिवेंद्रम, पंजाब या भागांत संपाचा अधिक परिणाम जाणवल्याचे सांगण्यात येते. सहयोगी बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’ (एआयबीईए)च्या पदाधिकाऱ्यांची बैठक १३ जानेवारी रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2016 12:40 am

Web Title: zero results of bank strike
टॅग : State Bank Of India
Next Stories
1 चिनी अ’न’र्थ
2 मुंबईत १३ फेब्रुवारीपासून ‘मेक इन इंडिया’ सप्ताह
3 अधिक क्षमतेच्या दुचाकीमध्ये अव्वलतेचा ‘बजाज’चा दावा
Just Now!
X