१४ जुलैपासून प्रत्येकी ७२ ते ७६ रुपयांनी समभाग विक्री

मुंबई : घरोघरी खाद्यपदार्थाचा बटवडा करणारे व्यासपीठ असलेल्या झोमॅटोचे भांडवली बाजारात प्रवेशासह, आता गुंतवणूकदारांच्या तोंडाला पाणी आणणाऱ्या परताव्याच्या बटवडय़ासाठी पाऊल पडले आहे. येत्या १४ जुलै ते १६ जुलै दरम्यान या नव्या पिढीच्या कंपनीची प्रारंभिक समभाग विक्री प्रत्येकी ७२ रुपये ते ७६ रुपयांदरम्यान योजण्यात आली आहे.

अलीकडच्या काळात सर्वाधिक उत्सुकतेने वाट पाहिल्या गेलेल्या प्रारंभिक समभाग विक्रीची अखेर गुरुवारी घोषणा करण्यात आली. या भागविक्रीच्या माध्यमातून झोमॅटोने ९,३७५ कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. यापैकी ३७५ कोटी रुपये हे इन्फो एज (इंडिया) लिमिटेड ही मूळ गुंतवणूकदार कंपनी तिच्याकडील समभाग विकून मिळवेल, तर नव्याने समभाग जारी करून कंपनीकडून ९,००० कोटी रुपये उभारले जातील.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
knight frank wealth report 2024
अग्रलेख : अधिक की व्यापक?
traffic problem in Pune
पुण्यातील बिघडलेल्या वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाकडून दखल, परिस्थितीचा फेरआढावा घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?

वैयक्तिक गुंतवणूकदारांना अर्ज करताना, किमान १९५ समभागांसाठी आणि त्यापुढे १९५च्या पटीत (दोन लाख रुपयांच्या गुंतवणूक मूल्यांपर्यंत) समभागांसाठी बोली लावता येईल.

भागविक्रीपश्चात कंपनीचे बाजार मूल्यांकन हे ६४,३६५ कोटी रुपयांच्या घरात जाईल, असे झोमॅटोचे मुख्य वित्तीय अधिकारी अक्षत गोयल यांनी सांगितले. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये झोमॅटोचा महसूल आधीच्या वर्षांच्या तुलनेत दोन पटींनी वाढून २,९६० कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. तर व्याज, कर व घसाऱ्यापश्चात कंपनीला २,२०० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

महत्त्वाचे काय..

९   किमान १९५ समभागांसाठी बोली लावता येईल.

९   बोलीसाठी किंमतपट्टा ७२ ते ७६  रुपये प्रति समभाग

९   किमान अर्ज रक्कम – १४,०४० रु.

े९   कालावधी – १४ जुलै ते १६ जुलै