झूम उपयोजनाचा वापर करून विकसक व्यासपीठ आणि हार्डवेअर एकात्मीकरणाला उत्तेजन देण्यासाठी झूम व्हिडीओ कम्युनिकेशन्सने १० कोटी अमेरिकी डॉलरच्या साहसी भांडवलाची घोषणा केली आहे.

प्रारंभिक घडणीच्या काळात गुंतवणूकदारांची भांडवली मदत किती मोलाची असते याची आपल्याला कल्पना असल्याचे झूमचे मुख्याधिकारी व संस्थापक एरिक युआन यांनी नमूद केले.

सध्या डझनभर झूम अ‍ॅप्स निर्माण केले जात आहेत आणि दृकश्राव्य संपर्काचे भविष्य घडविण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. ही व्यवहार्य उत्पादने आणि विकसक भागीदारांमध्ये गुंतवणूक या साहसी भांडवल निधीतून गुंतवणूक केली जाणार आहे.