मुंबई : देशभरात ऑनलाइन व्यवहारांचा अवलंब उत्तरोत्तर वाढत असून, मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत देशभरातील डिजिटल देयक व्यवहारांमध्ये २९ टक्के वाढ नोंदवली गेल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेच्या ताज्या निर्देशांकावरून बुधवारी स्पष्ट झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिझव्‍‌र्ह बँकेने रचना केलेला आणि नव्याने कार्यान्वित झालेला ‘डिजिटल पेमेंट इंडेक्स’ (आरबीआय-डीपीआय) हा लक्षणीय वाढ दर्शवीत मार्च २०२२ अखेर ३४९.३ टक्के नोंदला गेला, जो सप्टेंबर २०२१ मध्ये ३०४.०६ टक्के आणि मार्च २०२१ मध्ये २७०.५९ टक्के पातळीवर होता. संपूर्ण देशभरातील देयक व्यवहारांतील डिजिटलीकरणाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने मार्च २०१८ मधील स्थिती आधारभूत धरून या समग्र निर्देशांकाची रचना केली असून, मार्च २०२१ पासून अर्धवार्षिक तत्त्वावर विविध मापदंडाच्या आधारे त्याच्या नोंदी घेणे सुरू केले आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 29 percent annual growth in digital payment transactions zws
First published on: 28-07-2022 at 03:12 IST