नवी दिल्ली : देशाला २०२५ पर्यंत ‘५ ट्रिलियन’ म्हणजेच ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये दूरसंचार क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल. डिजिटल माध्यमाचेच अर्थव्यवस्थेत एक लाख कोटी रुपयांचे योगदान असेल, असे प्रतिपादन आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी बुधवारी केले. ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकारण्यासाठी उद्योगांनी  गुंतवणूक वाढ्विणे आवश्यक आहे.