मुंबई : जागतिक भांडवली बाजारातील तेजीच्या आल्हादाने स्थानिक बाजारातील प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने सोमवारी २३० अंशांच्या कमाईसह ६१,०००च्या शिखर स्थानावर पुन्हा चढाई केली. विशेषत: बँका, वाहन आणि धातू समभागांमधील जोरदार खरेदी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत मजबूत रुपया, परकीय गुंतवणूकदारांकडून आलेला भांडवलाचा ओघ हे घटक तेजीच्या पथ्यावर पडले.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ सलग दुसऱ्या सत्रात २३४.७९ अंशांनी किंवा ०.३९ टक्क्यांनी वाढून ६१,१८५.१५ वर बंद झाला. सत्रादरम्यान निर्देशांकाने ६१,४०१.५४ अंशांचा उच्चांक आणि ६०,७१४.३६ अंशांचा नीचांक नोंदवला. याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा विस्तारित निफ्टी निर्देशांक ८५.६५ अंशांनी किंवा ०.४७ टक्क्यांनी वाढून १८,२०२.८० वर बंद झाला. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने शनिवारी १३,२६५ कोटी रुपयांचा आजवरचा सर्वाधिक तिमाही नफा नोंदविणारी कामगिरी जाहीर केली. वर्षभराच्या तुलनेत नफ्यात यंदाच्या तिमाहीत झालेली तब्बल ७४ टक्क्यांच्या वाढीच्या या बहारदार कामगिरीचे स्वागत म्हणून सोमवारी बँकेच्या समभागाने ३.४४ टक्क्यांनी झेप घेतली.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Sensex eight hundredth retreat due to concerns over US inflation protracted tariff cuts
अमेरिकेतील महागाई, लांबलेल्या दरकपातीच्या चिंतेने ‘सेन्सेक्स’ची आठ शतकी माघार
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड