8 percent dividend proposed in Cosmos Bank Annual General Meeting ysh 95 | Loksatta

कॉसमॉस बँकेच्या वार्षिक सभेत ८ टक्के लाभांशाचा प्रस्ताव

सहकार क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेला ३१ मार्च २०२२ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षांत ३५० कोटी रुपयांचा ढोबळ नफा, तर ६५.९१ कोटी रुपयांचा करपश्चात निव्वळ नफा झाला आहे.

कॉसमॉस बँकेच्या वार्षिक सभेत ८ टक्के लाभांशाचा प्रस्ताव
डावीकडून बँकेचे संचालक अ‍ॅड. प्रल्हाद कोकरे, व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे, अध्यक्ष सीए मिलिंद काळे आणि उपाध्यक्ष सचिन आपटे.

पुणे : सहकार क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेला ३१ मार्च २०२२ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षांत ३५० कोटी रुपयांचा ढोबळ नफा, तर ६५.९१ कोटी रुपयांचा करपश्चात निव्वळ नफा झाला आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या मंगळवारी पार पडलेल्या ११६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सरलेल्या २०२१-२२ आर्थिक वर्षांकरिता सभासदांना ८ टक्के लाभांश देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सनदी लेखापाल मिलिंद काळे यांनी दिली.

वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. मार्च २०२२ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षांत बँकेची आर्थिक स्थिती समाधानकारक असून एकूण राखीव निधी १,७६५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेच्या भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण (सीआरएआर) १३.१९ टक्के आहे. बँकेकडील ठेवी सरलेल्या वर्षांत १६,५२२ कोटींवर पोहोचल्या आहेत. तर बँकेने १२,२९२ कोटींचे कर्जवितरण केले. या काळात बँकेचा एकूण व्यवसाय २८,८०० कोटींहून अधिक झाल्याची माहिती काळे यांनी दिली.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-09-2022 at 00:02 IST
Next Story
बाजाराला अस्थिरतेचे ग्रहण; निर्देशांकांत किरकोळ घसरण