विमान इंधनदर ५ टक्के वाढीने विक्रमी पातळीवर | A record 5 percent increase In the price aircraft fuel record highs ysh 95 | Loksatta

विमान इंधनदर ५ टक्के वाढीने विक्रमी पातळीवर

विमानाच्या इंधनाच्या दरात सोमवारी ५.३ टक्क्यांची वाढ केली गेल्याने त्याचे दर विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.

विमान इंधनदर ५ टक्के वाढीने विक्रमी पातळीवर

पीटीआय, नवी दिल्ली : विमानाच्या इंधनाच्या दरात सोमवारी ५.३ टक्क्यांची वाढ केली गेल्याने त्याचे दर विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय दरात वाढ झाल्यामुळे इंधन दरात सतत वाढ सुरू आहे. चालू वर्षांतील ही सलग दहावी वाढ आहे. विमानांसाठी इंधन म्हणून वापरात येणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन फ्युएलचे (एटीएफ) दर किलोलिटरमागे ६,१८८.२५ रुपयांनी म्हणजेच ५.२९ टक्क्यांनी वाढल्याने, दिल्लीत त्याची किंमत आता किलोलिटरला १,२३,०३९.७१ रुपये झाली असल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी दरांबाबत जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. एटीएफ दराने मार्च महिन्यात पहिल्यांदाच एक लाख रुपयांची पातळी ओलांडली होती. तेथूनही त्यात निरंतर वाढ सुरू असून ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. तर मुंबईमध्ये एटीएफचे दर किलोलिटरला १,२१,८४७.११ रुपयांवर पोहोचले आहे.

चालू वर्षांत ५५ टक्के वाढ

विमानाच्या इंधनाच्या दरांमध्ये सलग दहाव्यांदा वाढ झाली आहे. नवीन वर्षांत म्हणजेच २०२२ च्या सुरुवातीपासून दर पंधरवडय़ाला एटीएफच्या किमती वाढल्या आहेत. चालू वर्षांत जानेवारीपासून एटीएफचे दर किलोलिटरमागे ४९,०१७.८ म्हणजेच ५५ टक्क्यांनी वधारले आहेत. विमान कंपनीच्या चालू खर्चाच्या जवळपास ४० टक्के खर्च इंधनावर होतो. सुमारे दोन वर्षांनंतर पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या विमान कंपन्यांवरील आर्थिक ताण त्यामुळे आणखी वाढला आहे. यातून विमान प्रवास भाडे वाढविले गेल्यास प्रवाशांकडून पाठ फिरविली जाण्याची भीतीही कंपन्यांना सतावत आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
चांगल्या पावसाळय़ाच्या अंदाजाने महागाईत दिलासा शक्य – संजीव बजाज

संबंधित बातम्या

Gold-Silver Price on 24 July 2022: जाणून घ्या, आजचा सोने-चांदीचा भाव
सेन्सेक्सची गेल्या ११ महिन्यांतील विक्रमी उसळी
उच्चांकांपासून निर्देशांक आणखी दूर
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘डबल बोनस’चा लाभ; जाणून घ्या नक्की रक्कम मिळणार
Gold-Silver: नवरात्रीच्या सातव्या दिवशीही किंमतीमध्ये बदल; जाणून घ्या आजचा दर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबईचा कायापालट करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना निर्देश
हार्दिकशी लग्नगाठ बांधल्यानंतर अक्षया भावूक; लग्नाची तारीख कोरलेल्या नखांचा फोटो शेअर करत म्हणली…
Video: “तुम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून…”; सुनावणीदरम्यान हायकोर्टातील न्यायमूर्तींचा सरकारी अधिकाऱ्याला अजब प्रश्न
IND vs BAN 2nd ODI: मेहदी हसनच्या नाबाद शतकाच्या जोरावर, बांगलादेशचे भारताला २७२ धावांचे लक्ष्य
युरिक ऍसिडचा त्रास झटक्यात कमी करा; काजू बदमासह ‘हे’ पाच नट्स करतील अमृतासमान काम