मुंबई : अदानी समूहाने एकूण ६.५ अब्ज डॉलरच्या (सुमारे ५२ हजार कोटी रुपये) मोबदल्यात अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी या कंपन्यांच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची घोषणा शुक्रवारी केली. स्विस कंपनी होल्सिमची या दोन कंपन्यांमधील हिश्शाची खरेदी आणि त्यानंतर अल्पसंख्याक भागधारकांकडून खुल्या प्रस्तावाद्वारे समभागांच्या खरेदीचा यात समावेश आहे. संपादन व्यवहार पूर्ण झाल्यानंतर अदानी हा देशातील सीमेंट क्षेत्रातील दुसरा मोठा समूह बनून पुढे आला आहे. अदानी यांनी ताबा घेतल्यानंतर लगेचच, दोन सिमेंट कंपन्यांनी सीईओ आणि सीएफओसह त्यांच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. अंबुजा सीमेंट्सच्या नवनियुक्त संचालक मंडळाने,  बाजारातील वाढीच्या क्षमता काबीज करण्यासाठी कंपनीमध्ये अतिरिक्त २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास मान्यता दिली. दोन सिमेंट कंपन्यांचे संपादन हा देशातील पायाभूत सुविधा आणि सामग्री क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठा आणि अदानी समूहाद्वारे पार पडलेला सर्वात मोठा अधिग्रहण व्यवहार आहे.

नेतृत्त्वपद करण अदानीकडे

Indian seed industry turnover of rs 30 thousand crore
देशातील बियाणे उद्योगाची स्थिती काय? जाणून घ्या. बियाणे उद्योगाची उलाढाल
Saima ubaid First female powerlifter from Kashmir
सायमा ओबेद… कश्मिरमधील पहिली महिला पॉवरलिफ्टर
loksatta analysis ai based system to reduce human wildlife conflict in tadoba andhari tiger reserve
विश्लेषण : ताडोबातील वन्यजीवमानव संघर्षात ‘एआय’ नेमके काय करणार?
Halve the price of high priced garlic
लसूण स्वस्त; ग्राहकांना दिलासा, परराज्यातील लसणाचा हंगाम सुरू

अब्जाधीश गौतम अदानी यांचा मुलगा करण हा समूहाने विकत घेतलेल्या सिमेंट कंपन्यांचे नेतृत्व करेल. सध्या समूहाच्या बंदर व्यवसायाचे प्रमुख असलेल्या करणला दोन्ही सिमेंट कंपन्यांचा संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शिवाय अंबुजा सिमेंटच्या संचालक मंडळावर स्टेट बँकेचे माजी अध्यक्ष रजनीश कुमार आणि एसीसीच्या संचालक मंडळावर शेल इंडियाचे माजी प्रमुख नितीन शुक्ला यांचा समावेश केला गेला आहे.