अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानवर झेप घेतली आहे. चीनमधील उद्योजक झोंग शानशान यांना अदानींने मागे टाकलं आहे. ब्लुमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार शेअर बाजारात अदानी समुहाच्या समभागांची म्हणजेच शेअर्सची मागणी वाढल्याने त्यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतलीय.

झोंग हे फेब्रुवारीपर्यंत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी होते मात्र रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्यांना मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं. या वर्षी अंबानींना १७५.५ मिलियन अमेरिकन डॉलर्सचं नुकसान झालं आहे तर दुसरीकडे अदानींच्या एकूण संपत्तीमध्ये ३२.७ बिलियन अमेरिकन डॉलर्सने (२३८ कोटी ६७० लाखांनी ) वाढ झालीय. अदानींची एकूण संपत्ती ६६.५ बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहचली असून झोंग यांची एकूण संपत्ती ६३.६ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. अंबांनींची एकूण संपत्ती ७६.५ बिलियन डॉलर्स इतकी आहे. अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १३ व्या स्थानी आहेत. सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानींनी १४ व्या स्थानी झेप घेतलीय.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
knight frank wealth report 2024
अग्रलेख : अधिक की व्यापक?
Pune city leads the country in house sales Pune news
घरांच्या विक्रीत देशात पुण्याची आघाडी! जाणून घ्या शहरातील कोणत्या भागाला सर्वाधिक पसंती…
India economy grew by 8.4 percent
Good News : भारताच्या अर्थव्यवस्थेची तिसऱ्या तिमाहीत ८.४ टक्क्यांनी वाढ

मार्च महिन्यामध्ये समोर आलेल्या एका अहवालामध्ये संपत्तीत सर्वाधिक भर नोंदविणाऱ्यांमध्ये गौतम अदानी यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रक्रम राहिल्याचं स्पष्ट झालं होतं. संपत्तीत भर होण्याच्या बाबतीत अदानींनी रिलायन्सचे मुकेश अंबानी तसेच टेस्लाचे एलन मस्क यांनाही मागे टाकले आहे. अदानी एंटरप्राइजेसचे अध्यक्ष गौतम अदानी यांची निव्वळ मालमत्ता वर्ष २०२१ मध्ये आतापर्यंत १६.२ अब्ज डॉलरने वाढून ५० अब्ज डॉलर झाल्याचं या अहवालात म्हटलं होतं. ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या निर्देशांकांमध्ये अदानी यांचे नाव संपत्तीत भर टाकण्यामध्ये अग्रणी आहे. त्यांनी टेस्लाच्या मस्कना यांनाही याबाबत मागे टाकले आहे. मस्कना यांची याबाबत अ‍ॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांच्याशीही स्पर्धा राहिल्याचं दिसून आलं.

अदानी समूहातील जवळपास सर्वच लिस्टेट कंपन्यांचे बाजारमूल्य चालू वर्षात थेट ५० टक्क्यांपर्यंत झेपावले आहे. समूह वीज, खनिकर्म, वायू, बंदर, विमानतळ अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. अदानी समूहाने गेल्या वर्षी, २०२० मध्ये मालमत्तेतील तब्बल ५३२ टक्के वाढ नोंदवली होती. पैकी सर्वाधिक १८ अब्ज डॉलर मालमत्ता अदानी ग्रीन एनर्जी कंपनीची आहे. अदानी टोटल गॅसचे मूल्य सर्वाधिक, ९७ टक्क्यांनी वाढले आहे. तर मुख्य प्रवर्तक अदानी एंटरप्राइजेस ८७ टक्क्यांनी वाढला. अदानी एनर्जी ग्रीनचे मूल्य तूर्त १० टक्क्यांनी वाढले आहे.