* अँकर इलेक्ट्रिकल्सने आणली भारतीय बाजारपेठेत प्रोफेशनल लायटिंग सोल्यूशन्स
इलेक्ट्रिकल्स लाईट्स क्षेत्रात सध्या ‘एलईडी’ तत्रज्ञानाची चलती आहे. नेहमीच्या बल्बची जागा आता ‘एलईडी’ दिवे घेऊ लागलेत. इतकेच काय तर, यंदाचे नोबेल पारितोषिक देखील ‘लाइट एमिटिंग डायोड’ म्हणजेच ‘एलईडी’ तंत्रज्ञानाला मिळाले आहे. असे हे ‘एलईडी’चे वाढते साम्राज्य लक्षात घेता ‘पॅनसॉनिक ग्रुप’ची अँकर इलेक्ट्रिकल्स कंपनी देखील ‘एलईडी’च्या या वाढत्या स्पर्धेच्या मैदानात उतरली आहे. गुरूवारी मुंबईत या कंपनीने ‘प्रोफेशनल एलईडी लायटिंग सोल्यूशन्स’ भारतात सुरू करत असल्याची घोषणा केली. यात तब्बल २७६ एलईडी उत्पादने अँकर कंपनीने भारतीय बाजारपेठेत आणली आहेत.
अँकरची ही ‘एलईडी’ लाईट्सची श्रेणी आकर्षकरित्या डिझाईन करण्यात आली असून यामध्ये सर्वोत्कृष्ट तांत्रिक निकष लावण्यात आले आहेत. तसेच ग्राहकांच्या विविध आवडींचाही यामध्ये विचार करण्यात आला आहे. विशेष पद्धतीने तयार करण्यात आलेल्या हिट सिंक, अॅन्टी ग्लेअर डिफ्यूजर आणि विशेष म्हणजे, उर्जा वाचवणारे इलेक्ट्रॉनिक ड्रायव्हर्स यांमुळे अधिक दीर्घकालीन सेवा मिळून देण्यावर भर देण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.
उत्पादनांची बेस्ट बाय रेंज ही भारतीय व्यावसायिक विभागासाठी तयार करण्यात आली असून यामध्ये १३० उत्पादने जसे स्पॉट लाईट्स, डाऊन लाईट्स, बॅटन लाईट्स इत्यादींचा समावेश आहे.