दिल्लीनंतर कंपनी देशभरात जाळे विणणार
काळी-पिवळी टॅक्सी आणि कुल कॅब सेवा पुरविणारी शासनमान्य अधिकृत कंपनी असलेल्या अपना कॅब्सने मुंबईमधील आपल्या सेवेची घोषणा केली आहे. ‘कॉल टॅक्सी स्कीम २०१०’ अंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून मान्यतेचा परवाना मिळालेल्या अपना कॅब्सने, मुंबईकरांना सर्वाधिक सुरक्षित, संरक्षित आणि वैयक्तिक परिवहन उपयोजना पुरवून या क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणण्यास सज्ज असल्याचा दावा यानिमित्ताने केला आहे.
अपना कॅब्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत लिंगीडी म्हणाले की, ग्राहकांची सुरक्षितता आणि शासनाच्या नियमांशी सुसंगती या प्रामुख्याने दोन आव्हानांशी देशातील टॅक्सी सेवा आज झगडते आहे. अपना कॅब्सच्या माध्यमातून आम्ही ही सर्व प्रकारची दरी मिटविण्यासाठी कटिबद्ध आहोत. शहरातील सर्व प्रवाशांना सर्वात किफायतशीर, सुरक्षित, सुलभ आणि स्वस्त सेवा पुरविण्याकडे आमचा कटाक्ष आहे.