नवी दिल्ली : सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकांकडून व्याज दरवाढीचे सत्र सुरू असून अ‍ॅक्सिस बँकेने निधीआधारित कर्ज दर अर्थात एमसीएलआर संलग्न कर्जाच्या व्याज दरांमध्ये २५ आधारिबदूंची वाढ केली आहे. बँकेचे सुधारित व्याज दर १८ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आले आहेत. बँकेच्या एक दिवस ते तीन वर्षे मुदतीच्या कर्जावरील व्याज दर आता ८.१५ ते ८.५० टक्क्यांदरम्यान पोहोचले आहे. यामुळे बँकेच्या वैयक्तिक, गृह तसेच वाहन यांसारखी ग्राहक कर्जे महाग होणार आहेत.

हेही वाचा >>> “आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…” बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर बोचरी टीका!

रिझव्‍‌र्ह बँकेने सलग तिसऱ्यांदा रेपो दरात ५० आधारिबदूंची वाढ केली आहे. त्यात मे महिन्यापासून आतापर्यंत १९० आधारिबदूंची वाढ झाली असून रेपो दर ५.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. आता रिझव्‍‌र्ह बँकेची पत धोरण समितीची पुढील बैठक ५ ते ७ डिसेंबरदरम्यान पार पडणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून पुन्हा रेपो दरात वाढ होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सरकारी मालकीच्या स्टेट बँकेने गेल्या आठवडय़ात व्याजदरात ५० आधारिबदू म्हणजेच अर्ध्या टक्क्यानी वाढ केली आहे. तिचा एक दिवस ते तीन वर्षे मुदतीच्या कर्जाचा दर आता ७.६० टक्के ते ८.२५ टक्क्यांवर पोहोचले आहेत. त्यापाठोपाठ कोटक मिहद्र बँक आणि फेडरल बँकेनेदेखील किरकोळ निधीआधारित कर्ज दर (एमसीएलआर) संलग्न कर्जाच्या व्याज दरांमध्ये १६ ऑक्टोबरपासून वाढीची घोषणा केली आहे.