मुंबई : आजवरच्या परंपरेप्रमाणे द्विपक्षीय वाटाघाटीच्या प्रथेपासून फारकत घेत बँक व्यवस्थापनाच्या एकतर्फी निर्णय लादण्याचा निषेध म्हणून, ‘अखिल भारतीय बँक कर्मचारी महासंघ (एआयबीईए)’ने येत्या १९ नोव्हेंबररला एक दिवसाच्या देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. पुढील आठवडय़ात शनिवारी होत असलेल्या संपामुळे, बँकांच्या शाखातील कामकाजावर परिणाम होण्यासह सलग सुट्टय़ांमुळे एटीएममध्ये खडखडाट होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या घडीला देशातील अनेक बँकांमध्ये कर्मचारी व व्यवस्थापनाच्या दरम्यान बँकनिहाय प्रश्नावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारच्या जीवन ज्योती, जीवन सुरक्षा, अटल पेन्शन, मुद्रा, स्वनिधी व तत्सम विविध योजना राबवण्याची जबाबदारी बँक कर्मचारी पार पाडत आहेत. आधीच अपुरा कर्मचारी वर्ग, कामाचा वाढता बोजा असताना, व्यवस्थापनाच्या मनमानी धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये विफलतेची भावना निर्माण झाली आहे, असे महासंघाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले. व्यवस्थापनाची ही मनमानी आणि सरकारच्या बँकांच्या खासगीकरणाच्या धोरणाचा विरोध म्हणून महासंघाचे विविध बँकांतील तीन लाखांहून अधिक कर्मचारी सभासद संपात सहभाग घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank employees strike november 19 possibility of atm fraud ysh
First published on: 09-11-2022 at 00:02 IST