बँक ऑफ महाराष्ट्रला ‘स्कॉच’ पुरस्कार

स्कॉच पुरस्कारांची निवड पद्धती अत्यंत पारदर्शक

बँक ऑफ महाराष्ट्रला वित्तीय सर्वसमावेशकतेच्या कामगिरीसाठी प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार २०१६’ नुकताच मुंबई शेअर बाजार इमारतीतील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला.
स्कॉच पुरस्कारांची निवड पद्धती अत्यंत पारदर्शक असून यामध्ये तज्ज्ञांकडून प्रकल्प समीक्षा, जाणकार समीक्षकाद्वारे तपासणी, फेरतपासणी, मतदान पद्धती तसेच प्रत्यक्ष सहभागींकडून मूल्यमापन अशा वेगवेगळ्या कसोटय़ा पार करून आलेल्या व्यक्ती वा संस्थांना पुरस्कारास पात्र समजले जाते. बँक ऑफ महाराष्ट्रचे वित्तीय समावेशन तंत्रज्ञान, ‘बँक मित्रां’ची नेमणूक, वित्तीय समावेशनअंतर्गत होणाऱ्या व्यवहारांची संख्या, बचत खात्यांना आधार जोडणीचे प्रमाण, तसेच बँक मित्रांना देण्यात येणाऱ्या वेतनाची नियमितता आदी बाबतीत बँकेच्या सरस कामगिरीमुळे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्कॉच समूहाचे अध्यक्ष समीर कोचर व सेबीचे पूर्ण वेळ सदस्य राजीवकुमार आगरवाल यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. बँकेच्या वित्तीय समावेशन विभागाचे उपमहाव्यवस्थापक चारुदत अर्काटकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bank of maharashtra won skoch award