बंगळुरूस्थित कार्यालयीन उपाययोजना प्रस्तुत करणारी कंपनी ‘बेनीर ई-स्टोअर’ने फ्रान्स येथे मुख्यालय असलेल्या आणि बी २ बी कार्यालयीन उत्पादनांमध्ये जागतिक अग्रेसर कंपनी ‘लिरेको’सह भागीदारी करार केला आहे. भारतीय उद्योगविश्व केवळ देशातच नव्हे तर जगभरात सिंगल व्हेंडरच्या दिशेने वाटचाल करीत असताना, अगदी योग्य वेळी घडून आलेल्या या भागीदारीमुळे कंपनीचे बाजारपेठेतील स्थान अधिक सक्षम होण्यास हातभार लागेल, अशी प्रतिक्रिया बेनीर ई-स्टोअरचे संचालक हिमांशू नाईक यांनी व्यक्त केली. लिरेकोचे जगभरात ४१ देशांमध्ये अस्तित्त्व असून, २७ देशांत ही कंपनी स्वत: तर उर्वरित १४ देशांमध्ये भागीदारांच्या माध्यमातून सेवा प्रदान करीत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jan 2013 रोजी प्रकाशित
बेनीर ई-स्टोअरची ‘लिरेको’सह भागीदारी
बंगळुरूस्थित कार्यालयीन उपाययोजना प्रस्तुत करणारी कंपनी ‘बेनीर ई-स्टोअर’ने फ्रान्स येथे मुख्यालय असलेल्या आणि बी २ बी कार्यालयीन उत्पादनांमध्ये जागतिक अग्रेसर कंपनी ‘लिरेको’सह भागीदारी करार केला आहे.
First published on: 18-01-2013 at 12:38 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benir e store invest in lirco