अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा ‘बजेट’ सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारने सर्वसामान्य करदात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नवी करप्रणाली देखील लागू करण्याची घोषणा केली. या बजेटबाबत सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. काही नेटकऱ्यांनी ‘अर्थसंकल्प २०२०’ वर मिम्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय म्हणत आहेत नेटकरी?

करदात्यांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी सरकार कटिबद्ध : अर्थमंत्री

करदाते कोणत्याही प्रकारच्या कर-जाचापासून मुक्त राहतील, याची हमी देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांन सांगितलं आहे. कर कायद्यामध्ये सुधारणा करण्यावर सरकारचा भर असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसंच यावेळी त्यांनी बँक दिवाळखोरीत निघाली किंवा त्यात काही घोटाळा झाला तरी खातेदाराच्या ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित असतील अशी घोषणा करत खातेदारांना दिलासा दिला.