बहुचर्चित दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे २०२३ साली बांधून पूर्ण होईल असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी संसदेत दुसरा अर्थसंकल्प सादर करताना म्हणाल्या. दिल्ली-मुंबई महामार्गामुळे होणारा परिणाम लक्षात घेऊन, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेला दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे प्रकल्पाला सर्वोच्च प्राधान्य देण्यास सांगितले आहे.

या एक्स्प्रेस वे मुळे व्यापार, व्यवसायाला मोठया प्रमाणात चालना मिळणार आहे. आणखी तीन वर्षांन तुम्ही दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे मुळे १२ तासात दिल्लीहून मुंबईला पोहोचाल असे सीतारामन म्हणाल्या.

आणखी वाचा – Budget 2020: सरकार ‘एलआयसी’ आणि ‘आयडीबीआय’मधील भागिदारी विकणार

या एक्स्प्रेस वे वर आठ मार्गिका असतील. भविष्यात ट्रॅफिकचा लोड वाढल्यास १२ मार्गिका करण्याची सुद्धा तरतूद करुन ठेवण्यात आली आहे.