Budget 2020: निर्मला सीतारामन यांनी अर्ध्यावरच सोडलं अर्थसंकल्पाचं भाषण, कारण…

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अडीच तासांपेक्षा अधिक काळ अर्थसंकल्प वाचून दाखवला

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अडीच तासांपेक्षा अधिक काळ अर्थसंकल्प वाचून दाखवला. पण त्यांना आपलं भाषण अर्ध्यावरच सोडावं लागलं…आणि आता पुढचं मी संसदेसमोर मांडते… असं म्हणून त्यांनी भाषणाला पूर्णविराम दिला. पण, असं काय झालं की, निर्मला सीतारामन यांना भाषण अर्ध्यावर सोडावं लागलं?

अर्थमंत्री सीतारामन यांनी सकाळी ११ वाजेपासून अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरूवात केली होती. प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळ्या घोषणा त्या करत होत्या. मध्ये-मध्ये कवितांच्या काही ओळी ऐकवत होत्या. काही पुरातन दाखले देत त्या भाषण करत होत्या. दोन तास उलटून गेले होते तरी भाषण सुरूच होते. सर्वच खासदार कंटाळल्याचे दिसत होते. त्यावर आणखी अर्धा तास सीतारामन यांनी घेतला होता. दीड वाजून गेला तरी अर्थमंत्री सीतारामन यांचे भाषण सुरूच होते. २ तास ४१ मिनिटांनी अखेर त्यांना थांबण्यावत आलं.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना टोकलं. आता थांबा, असा संदेश त्यांनी दिला. तरीही दोन पानेच शिल्लक आहेत, असं सीतारामन म्हणाल्या. पण खूप वेळ झाला असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आणि सीतारामन यांनी अखेर भाषण थांबवलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Budget 2020 finance minister nirmala sitharaman stops presentation in middle pkd 81 sgy

Next Story
सुबीर गोकर्ण यांच्या वारसदाराचा शोध सुरू व्यापार
ताज्या बातम्या