Budget 2020: सरकार ‘एलआयसी’ आणि ‘आयडीबीआय’मधील भागिदारी विकणार

“एलआयसीचा नवा इनिशिअल पब्लिक ऑफर (आयपीओ) बाजारात दाखल होणार आहे. याद्वारे सरकारने एलआयसी आणि आयडीबीआयमधील भागीदारीचा हिस्सा विकण्याचा प्रस्ताव मांडला आहे.”

एलआयसी आणि आयडीबीआय बँकेतील सरकारची भागिदारी विकणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी ही माहिती दिली.

सीतारामन म्हणाल्या, एलआयसीचा नवा इनिशिअल पब्लिक ऑफर (आयपीओ) बाजारात दाखल होणार आहे. या आयपीओद्वारे सरकारने एलआयसी आणि आयडीबीआय बँकेत आपल्या भागीदारीचा हिस्सा विकण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यासाठी सरकारने वित्त आयोगाच्या शिफारशी स्विकारल्या आहेत.

आणखी वाचा – Budget 2020: करदात्यांना मोदी सरकारचा दिलासा, असे आहेत नवे टॅक्स स्लॅब

दरम्यान, २०१९-२० च्या अर्थसंकल्पानंतर सरकारने बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसाठी (एनबीएफसी) अंशतः कर्ज गॅरंटीची नवी योजना तयार केली आहे. त्याचबरोबर सरकारी रोखे हे अनिवासी गुंतवणूकदारांसाठी देखील काढण्यात येतील, असेही यावेळी सितारामन यांनी स्पष्ट केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Budget 2020 government will sell share in lic and idbi bank aau

Next Story
ओंकार स्पेशिअ‍ॅलिटीचा चिपळूणमध्ये नवा प्रकल्प
ताज्या बातम्या