Budget 2020 – स्वच्छ हवेसाठी मोदी सरकारकडून ४,४०० कोटींची तरतूद

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषणाची पातळी वाढत चालली आहे. त्यामुळे स्वच्छ हवा मिळणे दुरापास्त होत चालले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषणाची पातळी वाढत चालली आहे. त्यामुळे स्वच्छ हवा मिळणे दुरापास्त होत चालले आहे. प्रदूषणामुळे विविध आजारांदेखील बळावत चालले आहेत. दिल्ली, मुंबई सारख्या शहरांमध्ये तर, स्वच्छ हवा हा एक गंभीर विषय आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने स्वच्छ हवेच्या मुद्दांकडे विशेष लक्ष दिले आहे. मोठया शहरांमध्ये स्वच्छ हवेसाठी नागरीक आग्रही असतात. स्वच्छ हवेचे प्रमाण कमी होणे हा अनेक जागरुक नागरिकांसाठी चिंतेचा विषय आहे.

आणखी वाचा – Budget 2020: “एप्रिलपासून जीएसटी भरण्याची प्रक्रिया होणार अधिक सोपी”

हीच बाब लक्षात घेऊन सरकारने स्वच्छ हवेसाठी ४,४०० कोटींची तरतूद केली आहे. स्वच्छ हवा नागरिकांना मिळाली पाहिजे. त्यासाठी राज्यांनी त्यांच्या पातळीवर अंमलबजावणी करावी, यासाठी केंद्र सरकारने ४,४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Budget 2020 govt allocates rs 4400 crore to ensure clean air dmp

ताज्या बातम्या