Budget 2020: सरकारी पदांच्या परीक्षेसंदर्भात अर्थमंत्र्यांची महत्वाची घोषणा

निर्मला सीतारामन यांनी युवकांसाठी सरकारी नोकऱ्यांसदर्भात महत्वपूर्ण घोषणा केली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

अर्थसंकल्पाचे वाचन करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी युवकांसाठी सरकारी नोकऱ्यांसदर्भात महत्वपूर्ण घोषणा केली आहे. नॉन गॅझेटेड म्हणजे तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या सरकारी पदांसाठी यापुढे एकच परीक्षा द्यावी लागेल असे सीतारामन यांनी जाहीर केले आहे.

सरकारने राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नॉन गॅझेटेड सरकारी पदांच्या भरतीसाठी एक कॉमन ऑनलाइन पात्रता परीक्षा घेण्याची जबाबदारी या राष्ट्रीय भरती संस्थेवर असेल अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.

सध्या युवकांना वेगवेगळया सरकारी पदांसाठी विविध परीक्षा द्यावा लागतात. त्यासाठी त्यांचा बराच वेळ आणि पैसा खर्च होतो. विद्यार्थ्यांची त्यातून सुटका करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. ही ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक परीक्षा केंद्र सुरु करण्याची सरकारची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा – Budget 2020: २०२३ मध्ये मुंबई-दिल्ली प्रवास होणार फक्त १२ तासांचा

शिक्षण क्षेत्रासाठी 99 हजार 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे. स्कील डेव्हलपमेंटवर 3 हजार कोटी खर्च करणार असल्याचंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Budget 2020 take just 1 exam for all non gazetted govt posts dmp

Next Story
जैवतंत्रज्ञान पिकांच्या कृषी संशोधनावरील स्थगिती
ताज्या बातम्या