केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२०-२१ वर्षासाठी सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लोकांच्या खिशात जास्तीत जास्त पैसे ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे असे त्या म्हणाल्या.
अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आता काही गोष्टी महागणार आहेत तर, काही स्वस्त होणार आहेत.

कशासाठी जास्त पैसे मोजावे लागणार
– वैद्यकीय साहित्य
– चप्पल
– फर्निचर
– पंखा
– सिगारेट, तंबाखू उत्पादने
– चिनी मातीच्या वस्तू
– चिकण माती
– स्टील
– कॉपर
– गाडयांचे सुट्टे भाग
– ठराविक इलेक्ट्रॉनिक गाडया
– निवडक खेळणी
– ठराविक मोबाइल वापराच्या वस्तू

काय स्वस्त होणार
– कच्ची साखर
– मलईरहित दूध
– सोया फायबर
– सोया प्रोटिन
– ठराविक मद्म
– प्राण्यांशी संबंधित उत्पादने
– शुद्धीकरण केलेलं टेरेफ्थॅलिक अॅसिड