संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज (शनिवार) केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्यास सीतारामन यांनी सुरुवात केली. अर्थसंकल्प मांडताना सीतारामन यांनी इंग्रजीबरोबरच हिंदी, संस्कृत, फ्रेन्च, काश्मीरी, तामिळ अशा अनेक भाषांचा वापर केला. सीतारामन यांनी आपल्या भाषणातील बराचसा भाग इंग्रजी भाषेमध्ये सादर केला. मात्र यावरुन अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. हिंदी ही भारतातील बहुतांश जनतेला समजते तर भाषण इंग्रजीमध्ये का? असा सवाल अनेकांनी ट्विटवरुन उपस्थित केला आहे.

सीतारामन यांनी अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे मांडण्याधी काश्मिरी भाषेमध्ये एक कविता सादर केली. भारत देशाचे कौतुक करणाऱ्या कवितेमधून भारत हा जगातील सर्वात प्रिय देश असल्याचे सांगितले. त्यानंतरही वेळोवेळी त्यांनी वेगवेगळ्या भाषांचा वापर करत अर्थसंकल्प सादर केला. मात्र काही मोजकी वाक्ये वगळता सीतारामन यांनी इंग्रजीवरच भर देत आपले अर्थसंकल्पीय भाषण केलं. यावरुनच नेटकऱ्यांनी सीतारामन यांना सुनावले आहे. सीतारामन यांच्या इंग्रजीच्या लहेज्यावरुन अनेकांनी आक्षेप नोंदवला. काहींनी त्यांना हिंदी शिकण्याचा सल्ला दिला. भारतातील सामान्य नागरिकांना हिंदी सहज समजू शकते त्यामुळे हिंदीमध्ये अर्थसंकल्प सादर करणारा अर्थमंत्री हवा असं मतही अनेकांनी व्यक्त केलं.

सगळ्यांना समजेल अशा भाषेत बोला

भारतीयांना समजेल अशा भाषेत

चतुर रामालिंगम आठवला…

त्या मध्येच हिंदी बोलतात तेव्हा

चांगलं हिंदी बोललात मॅडम

अडखळत होत्या

शाळेतले दिवस आठवले

इंग्रजीत का?

दुसरं कोणीतरी आणा

हड्डपन भाषा

इंग्रजीही बरं नाही आणि हिंदीही

आधी तुम्ही हिंदी शिका

दरम्यान, काँग्रेसनेही सीतारामन यांच्यावर काश्मीरसंदर्भातील कवितेवरुन टीका केली आहे. “कविता सादर केल्याने आर्थिक तोटा तसेच बेरोजगारी कमी होणार नाही. संसदेत अर्थसंकल्प सादर केला जात आहे की कवितांचा कार्यक्रम?,” असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला.