म्युच्युअल फंड खरेदी आता ई-कॉमर्सवर!

कंपन्यांना त्यांच्या विविध म्युच्युअल फंड योजना या मंचावर सुलभपणे विकता येतील.

यातून फंड उद्योगाला प्रोत्साहन व गुंतवणूकदार संख्येतही झपाटय़ाने वाढ होईल मिळेल, असा विश्वास बाजार नियामक ‘सेबी’चे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी व्यक्त केला.

‘केवायसी’ही ऑनलाइन होणार

वाढत्या ई-कॉमर्स मंचावर लोकप्रिय गुंतवणुकीचा म्युच्युअल फंड हा पर्यायही उपलब्ध करून देण्याचे सूतोवाच ‘सेबी’ने मंगळवारी केले आहे. कंपन्यांना त्यांच्या विविध म्युच्युअल फंड योजना या मंचावर सुलभपणे विकता येतील, यासाठी लवकरच नियमावली आणली जाणार आहे.

यातून फंड उद्योगाला प्रोत्साहन व गुंतवणूकदार संख्येतही झपाटय़ाने वाढ होईल मिळेल, असा विश्वास बाजार नियामक ‘सेबी’चे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी व्यक्त केला. बरोबरीने फंड गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेली ‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ ही प्रक्रियाही ऑनलाइन माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

‘फिक्की’ या उद्योग संघटनेच्या वतीने आयोजित भांडवली बाजार परिषदेच्या व्यासपीठावरून सिन्हा बोलत होते. चर्चेतील ई-कॉमर्स विषयाला हात घालत सिन्हा यांनी सांगितले की, म्युच्युअल फंड क्षेत्राला या परिघात आणण्यासाठी नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून लवकरच याबाबतची अंतिम नियमावली जाहीर केली जाईल.

नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक प्रक्रिया सुलभ करण्याचा, ‘केवायसी’ प्रक्रिया ऑनलाइन मंचावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. म्युच्युअल फंडांचा मर्यादित व्याप पाहता ई-कॉमर्स मंचाच्या व्यापक वापराची गरज व्यक्त करत सिन्हा यांनी याबाबत नियुक्त समितीच्या अंतिम बैठकीनंतर नियमन लागू होईल, असे स्पष्ट केले.

व्यवसाय दायित्व अहवालाची मात्रा विस्तारणार

ल्ल भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांना वार्षिक व्यवसाय दायित्व अहवाल (बीएसआर) सादर करण्याची सेबीची सक्ती अन्य कंपन्यांसाठीही विस्तारण्यात येणार आहे. सध्या मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारातील मोठे बाजार भांडवल असलेल्या पहिल्या १०० कंपन्यांना असा अहवाल वर्षांतून एकदा सादर करणे बंधनकारक आहे. सुशासित कारभाराचा भाग म्हणून अशीच सक्ती आघाडीच्या ५०० कंपन्यांपर्यंत विस्तारण्यात येणार असल्याचे सेबी अध्यक्ष सिन्हा यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Buy now mutual fund on e commerce