खाद्यतेलाच्या स्वस्ताईसाठी पावले

आयातीवरील मदार कमी करण्यासाठी केंद्राकडून ११,०४० कोटींची योजना  

(संग्रहित छायाचित्र)

आयातीवरील मदार कमी करण्यासाठी केंद्राकडून ११,०४० कोटींची योजना  

नवी दिल्ली :  देशांतर्गत खाद्यतेलाचे उत्पादन सध्याच्या तुलनेत २०२५-२६ पर्यंत तिपटीने वाढून, आयातीवरील मदार लक्षणीय कमी करण्याच्या दीघरेद्देशी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. राष्ट्रीय खाद्यतेल मिशन-पाम तेल (एनएमईओ-ओपी) नावाच्या योजनेसाठी पुढील पाच वर्षांसाठी ११,०४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात या योजनेचे सूतोवाच केले होते. देशांतर्गत पाम लागवडीला चालना देण्याच्या या योजनेची देशाची पूवरेत्तर राज्य आणि अंदमान आणि निकोबार बेटे ही सर्वात मोठी लाभार्थी ठरणार आहेत, असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

केंद्र आणि राज्य सरकार असा दोहोंकडून योजनेवर संयुक्तपणे खर्च केला जाणार आहे. केंद्राकडून ८,८४४ कोटी रुपयांचा, तर राज्यांकडून २,१९६ कोटी रुपयांचा वाटा उचलला जाणार आहे. सध्या याच धर्तीवर सुरू असलेल्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा मिशन-पाम तेल या योजनेची जागा नव्या योजनेकडून घेतली जाणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाम लागवडीखालील क्षेत्रात २०२५-२६ पर्यंत ६.५ लाख हेक्टरची अतिरिक्त भर पडून ते १० लाख हेक्टरवर जाईल. यातून देशांतर्गत कच्चे पाम तेल निर्मिती क्षमता २०२५-२६ पर्यंत ११.२० लाख टनांपर्यंत वाढेल. २०२९-३० पर्यंत ही क्षमता २८ लाख टनांची पातळी गाठेल, असे तोमर म्हणाले.

शेतकऱ्यांना पाम वृक्षाच्या लागवडीत साहाय्य आणि उत्पादित मालाच्या खात्रीशीर किमतीत खरेदी याची या योजनेने खातरजमा केली असल्याने, शेतकऱ्यांचाही उत्साही सहभाग योजनेत होईल, असा तोमर यांनी विश्वास व्यक्त केला.

पाम वृक्ष लागवडीला आणि त्यातून उत्पन्न मिळायला कमीत-कमी पाच ते सात वर्षे लागतात. लहान शेतकऱ्यांना इतका दीर्घकाळ प्रतीक्षा करणे शक्य नसते. शिवाय शेतकऱ्यांनी जरी लागवड केली तरी किमतीतील चढ-उतारांमुळे त्यांना अपेक्षित परताव्याची खात्री नसते. नव्या योजनेतून या आव्हानावर मात केली जाईल.

’  नरेंद्र सिंग तोमर, केंद्रीय कृषीमंत्री

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Central government steps to reduce edible oil zws

Next Story
ओंकार स्पेशिअ‍ॅलिटीचा चिपळूणमध्ये नवा प्रकल्प
ताज्या बातम्या