scorecardresearch

राज्यांना कर हस्तांतरणाच्या दोन हप्त्यांपोटी केंद्राकडून १.१६ लाख कोटींचे वितरण

या कर हस्तांतरणाच्या दोन हप्त्यांपोटी महाराष्ट्राला एकूण ७,३६९.७६ कोटी रुपये अदा करण्यात आले.

राज्यांना कर हस्तांतरणाच्या दोन हप्त्यांपोटी केंद्राकडून १.१६ लाख कोटींचे वितरण
( संग्रहित छायचित्र )

उत्तर प्रदेशला सर्वाधिक लाभ; महाराष्ट्राच्या वाटय़ाला ७,३६९ कोटी

नवी दिल्ली : नियमित मासिक कर हस्तांतरण ५८,३३२.८६ कोटी रुपयांप्रमाणे, केंद्र सरकारने बुधवारी राज्यांना कर हस्तांतरणाचे दोन हप्ते एकत्रपणे, म्हणजेच एकत्रित १,१६,६६५.७५ कोटी रुपयांची रक्कम वितरित केली.

सध्या केंद्राकडून गोळा केल्या जाणाऱ्या कर महसुलापैकी ४१ टक्के हे वित्त आयोगाने शिफारस केलेल्या राज्यांमध्ये आर्थिक वर्षांत १४ हप्त्यांमध्ये राज्यांमध्ये वितरित करण्यात येतात. राज्यांच्या भांडवली आणि विकास खर्चाला गती देण्याच्या दृष्टीने कटिबद्धतेनुसार केंद्राकडून राज्यांना ही कर हस्तांतरणाची रक्कम वितरित केली. या कर हस्तांतरणाच्या दोन हप्त्यांपोटी महाराष्ट्राला एकूण ७,३६९.७६ कोटी रुपये अदा करण्यात आले.

तर बिहार (११,७३४.२२ कोटी), मध्य प्रदेश (९,१५८.२४ कोटी), उत्तर प्रदेश (२०,९२८.६२ कोटी) आणि पश्चिम बंगाल (८,७७६.७६ कोटी) ही तुलनेने मोठी लाभार्थी राज्ये आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या