‘रिओ टिंटो’ची ‘लागू बंधू’च्या सहकार्यानाने दालन-शृंखला
हिरे, रत्नांचा साज असलेल्या दागिने निर्मितीत आठ दशकांपासून असलेल्या ‘लागू बंधू’च्या सहकार्याने हिरे दागिन्यांचा नवा ‘नजराणा’ ‘रिओ टिंटो’ने मुंबईकरांसाठी आणला आहे. केवळ हिऱ्यांचे तयार दागिने असलेल्या दादर (पश्चिम) येथील रानडे मार्गावरील ‘नजराणा’ दालनाचे उद्घाटन अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर-कोठारे हिने मंगळवारी केले.
विदेशातील अनेक हिऱ्यांच्या खाणीवर मालकी असलेल्या ‘रिओ टिंटो’ने ‘नजराणा’ ही तयार हिरे दागिन्यांची नाममुद्रा विकसित केली आहे. याद्वारे तिचे भारतात १५० दालने आहेत. स्थानिक प्रसिद्ध सराफ पेढय़ांच्या भागीदारीतून ‘नजराणा’मार्फत विविध सात श्रेणीतील दागिने मालिका सादर करण्यात आली आहे.
विशेषत: तरुण पिढीमध्ये वाढत असलेली हिरे दागिन्यांची पसंती लक्षात घेता तुलनेत माफक दरातील हिरे दागिन्यांचा ‘नजराणा’ सादर करण्यात येत असल्याचे ‘रिओ टिंटो’च्या भारतातील व्यवसायाचे संचालक विक्रम र्मचट यांनी सांगितले; तर हिरे तयार दागने निर्मितीत पूर्वीपासून असलेल्या ‘लागू बंधू’ने ‘नजराणा’ दालन भागीदारीमार्फत बदलत्या व्यवसायाची कास धरल्याचे ‘लागू बंधू’चे संचालक दिलीप लागू यांनी सांगितले.

वामन हरी पेठे ज्वेलर्सचे ‘कलर्स कलेक्शन’
मुंबई : मंगळवारपासून सुरू झालेल्या नवरात्रीच्या निमित्ताने वामन हरी पेठे ज्वेलर्सने तयार दागिन्यांचे नवे ‘कलर्स कलेक्शन’ सादर केले आहे. मौल्यवान खडे वापरून त्यावर केलेली बारीक कलाकुसर ही सोने तसेच चांदीच्या धाग्यांमध्ये गुंफण्यात आली आहे. कंठहार म्हणून वापरण्यासारखे हे दागने ७,००० ते २ लाख रुपये दरम्यान आहेत. ‘कलर्स कलेक्शन’ वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या सर्व २१ दालनांमध्ये असल्याची माहिती संचालक आदित्य पेठे यांनी दिली.