पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील कागदपत्रात बदल करण्यात आले आहेत. पीएम किसान योजनेबाबत दस्तऐवजात हा बदल फसव्या कारवायांना आळा घालण्यासाठी सरकारने दस्तऐवज नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या बदलांतर्गत, केवळ त्या शेतकऱ्यांनाच पीएम किसानचा लाभ मिळणार आहे, जे या योजनेअंतर्गत पात्र आहेत. या दस्तऐवजात बदल होण्यापूर्वी, ज्यांचे अर्ज एकतर बनावट होते किंवा पात्र नव्हते, असे अनेक लोक या योजनेचा लाभ घेत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन नियमानुसार, सरकारने आता या योजनेत रेशन कार्ड देणे अनिवार्य केले आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आता त्यांचा राशन कार्ड क्रमांक, आधार कार्डची सॉफ्ट कॉपी, बँक पासबुक आणि घोषणापत्र सादर करावे लागणार आहेत. या कागदपत्रांशिवाय शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in documents of pm kisan scheme ration card is mandatory to get money hrc
First published on: 19-01-2022 at 11:15 IST