शेअर बाजारात सूचिबद्ध प्रत्येक कंपनीत किमान एक महिला संचालिकेच्या नियुक्तीच्या सक्तीची अंतिम तिथी (३१ मार्च) नजीक येऊन ठेपली असताना, ‘सीआयआय- इंडियन वुमन नेटवर्क’ने उद्योग क्षेत्रातील लैंगिक विषमतेवर प्रकाश टाकणाऱ्या ‘वुमन अॅट वर्क’ पाहणी अहवालाचे गुरुवारी मुंबईत विमोचन करण्यात आले. त्या निमित्ताने आयोजित परिसंवादात, एल अँड टी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटच्या मुख्याधिकारी आशू सुयश, केलॉग इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका संगीता पेंडुरकर, सीआयआय-आयडब्ल्यूएनच्या अध्यक्षा मिनी मेनन, टाटा केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक आर. मुकुंदन, हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या अंजली रैना आणि एऑन ह्य़ूइटच्या राधिका गोपालकृष्णन. अडथळे, आव्हाने यांनाच उत्कर्षांची संधी म्हणून स्त्रियांनी पाहावे, असा परिसंवादातील सर्वच वक्त्यांमध्ये एक सूर दिसून आला.