तुटीतून सावरून चालू खात्यावर वरकड

निर्यात-आयातीतील दरी मानली जाणारी व्यापार तूट ही २०२०-२१ च्या जानेवारी ते मार्च तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १ टक्के होती.

करोनाने अर्थव्यवस्था खिळखिळी केलेल्या २०२०-२१ वित्त वर्षात देशाच्या चालू खात्यावर मात्र वरकड नोंदवली गेली आहे. आधीच्या वर्षात  देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ०.९ टक्के तूट होती, आता  वरकडीचे प्रमाणही तितकेच आहे.

निर्यात-आयातीतील दरी मानली जाणारी व्यापार तूट ही २०२०-२१ च्या जानेवारी ते मार्च तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १ टक्के होती. तर त्याआधीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० दरम्यान ती ०.३ टक्के होती.

वित्त वर्ष २०१९-२० मध्ये   देशाची व्यापार तूट १५७.५ अब्ज डॉलर होती. विशेष म्हणजे खासगी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय गुंतवणूक, उत्पन्न, देयक आदीच्या माध्यमातून झालेल्या निधीओघामुळे यंदा अधिक रक्कम जमा झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ४४ अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona economy in the financial year gross national product of the country in a year export import akp

ताज्या बातम्या