मुंबई: गृहकर्जाच्या व्याजाचे सर्वात कमी दर आणि राज्य सरकारने दिलेल्या सवलतींमुळे घर खरेदीदारांना विविध शुल्कात विकसकांनी दिलेली सूट यामुळे घर खरेदीसाठी सध्याचा काळ हा सुवर्णकाळ आहे, असे ‘क्रेडाई-एमसीएचआय’चे नूतन अध्यक्ष व प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक बोमन इराणी यांनी प्रतिपादन केले. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील विकास प्रक्रियेचा पुढील वीस वर्षांतील चेहरामोहरा कसा असावा याबाबत एक रूपरेषा मांडणारा अहवाल राज्य सरकारला देण्याचा संकल्प व्यक्त केला.  राज्यातील बांधकाम विकसकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘क्रेडाई-एमसीएचआय’च्या अध्यक्षपदाची सूत्रे बोमन इराणी यांनी नुकतीच स्वीकारली. यानिमित्त ‘लोकसत्ता’शी बोलताना इराणी यांनी बांधकाम व्यवसायातील सद्य:स्थिती, राज्य सरकारने दिलेल्या सवलतींचा परिणाम, गृहकर्जाच्या व्याजदरात झालेल्या कपातीचा होणारा लाभ आणि बांधकाम व्यावसायिकांच्या राज्य सरकारकडून असलेल्या अपेक्षा अशा विविध विषयांवर भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगर प्रदेशातील १,२४७ नामांकित बिल्डर सदस्य असलेल्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करायला मिळणे ही आनंदाची बाब आहे. राज्य सरकारचे बांधकामविषयक नियम, कायदे असोत की महापालिकांच्या नियमावली आमची संघटना वेळोवेळी त्याबाबतची अद्ययावत माहिती सदस्य विकसकांना देत असते. तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी किंवा विकास प्रक्रियेतील इतर विषयांवर राज्य सरकार आणि महापालिकांसमोर अहवाल-निवेदन सादर करत असते. सध्या आमच्या व्यवस्थापन समितीमध्ये २७ सदस्य आहेत ती संख्या ३५ वर नेण्याचा विचार आहे. त्याचबरोबर आमच्या सहा उपाध्यक्षांच्या कौशल्याचा वापर करून कायदा, महारेरा, नवीन धोरणे अशा विविध सहा विषयांवर आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि क्रांतिकारी असा दस्तऐवज तयार करून तो सरकारला देणे आणि त्याबाबत संबंधितांकडे पाठपुरावा करणे हा उपक्रम राबवणार आहे. ‘क्रेडाई-एमसीएचआय’अंतर्गत एक विशेष कृती गट तयार केला जाणार आहे. त्यात अनुज पुरी, गौतम चॅटर्जी, अंकुर गुप्ता, हाफिज कॉन्ट्रॅक्टर, अभिषेक लोढा आणि परीमल श्रॉफ या बांधकाम व्यवसायातील विविध विषयांतील सहा तज्ज्ञ जाणकारांचा समावेश असेल. मुंबई महानगर प्रदेशातील विकास प्रक्रियेचा चेहरामोहरा पुढील २० वर्षांत कसा असावा याची रूपरेषा मांडणारा एक अहवाल हा कृती गट तयार करेल आणि तो आम्ही राज्य सरकारला देऊ, असे बोमन इराणी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Credai mchi incoming president boman irani golden time for home buying zws
First published on: 25-01-2022 at 03:29 IST