मुंबई: सध्या बँकिंग क्षेत्रात व्याजाचे दर वाढून कर्जे महागण्याचा क्रम सुरू असताना, सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने  गृहकर्ज व्याजदरात २५ आधारबिंदू अर्थात पाव टक्क्यांनी कपात करून वार्षिक दर ८.२५ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला. सध्या हा घरांसाठी कर्जाचा सर्वात स्वस्त आणि परवडणारा व्याज दर असल्याचा बँकेने दावा केला आहे. व्याजदरात पाव टक्क्यांची सवलत देणारे हे सुधारित विशेष दर १४ नोव्हेंबर २०२२ पासून मर्यादित कालावधीकरिता, म्हणजेच ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत लागू असतील. उल्लेखनीय म्हणजे बँकेद्वारे या कर्जासाठी प्रक्रिया शुल्क देखील पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

पहिल्यांदाच गृह कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी ८.२५ टक्के या नवीन वार्षिक व्याजदराने कर्ज उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे अन्य बँकांकडे चालू असलेल्या कर्जाची उर्वरित रक्कम हस्तांतरणालाही (बॅलन्स  ट्रान्सफर) हाच दर लागू होईल. तथापि हा विशेष दर कर्ज-इच्छुकाच्या पतगुणांकांशी (क्रेडिट स्कोअर) जोडलेला असेल, असे बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक (तारण मालमत्ता) एच. टी. सोळंकी यांनी स्पष्ट केले. शून्य प्रक्रिया शुल्क, किमान दस्तऐवजासह गृह कर्जाची सुविधा, ३६० महिन्यांपर्यंतचा परतफेडीचा लवचीक कालावधी, पूर्व-भरणा/ अंशत: भरणा केल्यास शुल्क नाही, प्रमुख केंद्रांवर घरपोच सेवा आणि तत्पर संमतीसह डिजिटल गृहकर्ज मिळविण्याची सोय अशी या कर्ज योजनेची अन्य वैशिष्टय़े सोळंकी यांनी सांगितली.

400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
india current account deficit narrows to 1 2 percent of gdp in quarter 3
चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रण; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत १०.५ अब्ज डॉलरवर
Applications for police recruitment can now be made till April 15 mumbai
पोलीस भरतीसाठी आता १५ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार

‘कोटक’कडूनही कपात

मुंबई: खासगी क्षेत्रातील कोटक मिहद्रा बँकेने एक वर्षांच्या मुदतीसाठी निधी आधारित ऋणदरात (एमसीएलआर) २० आधारिबदूंनी कपात केली, तर इतर मुदतीसाठी कर्जाच्या व्याजदरात बँकेने वाढ केली आहे. एमसीएलआर मानदंडाशी संलग्न एक वर्षांच्या कालावधीसाठी जोडलेले कर्ज दर, ज्याचा वापर वाहन, गृह आणि वैयक्तिक कर्ज अशा ग्राहक कर्जाच्या किमतीसाठी बँकांकडून केला जातो, तो ८.७५ टक्क्यांवरून ८.५५ टक्के करण्यात आला आहे. कोटक बँकेने संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे, सुधारित एमसीएलआर संलग्न दर, बुधवार, १६ नोव्हेंबर २०२२ पासून लागू झाले आहेत. एमसीएलआर संलग्न दरांचे बँकांकडून मासिक आधारावर पुनरावलोकन केले जाते.