scorecardresearch

Premium

Russia-Ukraine War: रशिया युक्रेन युद्ध स्थितीमुळे बिटकॉइनबरोबर इतर अभासी चलनाची पडझड, गुंतवणूकदारांची चिंता वाढली

रशिया युक्रेन युद्धाचे पडसाद संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर जाणवू लागले आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युद्धाची घोषणा करताच अनेक देशांच्या शेअर बाजारात घसरण दिसून आली आहे.

bitcoin-1
Russia-Ukraine War: रशिया युक्रेन युद्ध स्थितीमुळे बिटकॉइनबरोबर इतर अभासी चलनाची पडझड, गुंतवणूकदारांची चिंता वाढली (Photo- Indian Express)

रशिया युक्रेन युद्धाचे पडसाद संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर जाणवू लागले आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युद्धाची घोषणा करताच अनेक देशांच्या शेअर बाजारात घसरण दिसून आली आहे. त्याचबरोबर अभासी चलन असलेल्या क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीही पडल्या आहेत. जगभारत क्रिप्टो १.६६ ट्रिलियन अमेरिकन इतकी गुंतवणूक आहे. मात्र गेल्या २४ तासात ७.९ टक्क्यांची घसरण झाली आहे. जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिनकॉइनलाही फटका बसला आहे. बिटकॉइनमध्ये १० टक्क्यांची घसरण झाली असून दर ३४,६१८ अमेरिकन डॉलरवर आला आहे.

बिटकॉइननंतर इथर या क्रिप्टोकरन्सीचा क्रमांक लागतो. इथरियम ब्लॉकचेनशी जोडलेल्या क्रिप्टोकरन्सीत देखील सुमारे १० टक्के घसरण झाली असून २,३७३ अमेरिकन डॉलरपर्यंत घसरला आहे. दरम्यान, Dogecoin ची किंमत १२ टक्क्यांपेक्षा कमी ०.११ अमेरिकन डॉलर्सवर व्यापार करत होती तर Shiba Inu देखील ०.००००२२ अमेरिकन डॉलर्सवर आला असून सुमारे १० टक्क्यांची घसरण झाली. तर सोलाना, XRP, टेरा, एवालान्च, स्टेलर, कार्डानो, पॉलीगॉन, पोल्काडॉटच्या किमती ८ ते १५ टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत. युद्धजन्य स्थिती पाहता अनेक गुंतवणूकदारांनी अभासी चलनाकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे. तसेच पारंपरिक गुंतवणूक असलेल्या सोनं खरेदीकडे धाव घेतली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमधील संकटामुळे अभासी चलन आणखी कमकुवत होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

reason behind Hamas attack on Israel
‘हमास’च्या इस्रायलवरील हल्ल्यामागचे कारण काय? आखातात मोठ्या युद्धाचा भडका उडणार?
migration of Nagorno-Karabakh people
विश्लेषण: नागोर्नो-कारबाखमधून सव्वा लाख लोकांचे स्थलांतर का? आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्या युद्धाचा इतिहास काय?
ukrainian president zelensky speech in un
अन्वयार्थ : आवाहनामागील कटुता
kim jong un meet putin
किम-रशिया यांच्यात लष्करी देवाणघेवाणीची शक्यता

Loan From Google Pay: गुगल पे वर मिळणार १ लाखांपर्यंत कर्ज, जाणून घ्या नव्या योजनेबद्दल

रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केली असून युद्धाला सुरुवात झाली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. पुतिन यांनी रशिया विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करणार सांगतना या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही सांगितलं. यावेळी त्यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घऱी निघून जा असंही सांगितलं. इतकंच नाही तर अमेरिकेसह इतर युरोपला मधे पडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. दरम्यान अमेरिकेने रशियाच्या निर्णयाचा विरोध केला असून गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला असून आणखी निर्बंध लावले जातील असं स्पष्ट केलं आहे. तर संयुक्त राष्ट्राने रशियाला शांतता ठेवण्यासाठी आवाहन केलं आहे. दुसरीकडे भारतानेही भारताने रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी करण्यासाठी आवाहन केलं असून मोठं संकट निर्माण होऊ शकतं असा इशारा दिला आहे. युक्रेनने युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडे विनंती केली असून देशात मार्शल लॉ लागू केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cryptocurrency prices dropped russia operations in eastern ukraine rmt

First published on: 24-02-2022 at 14:36 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×