प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

करोनाच्या पहिल्या लाटेच्या परिणामामुळे गेल्या वर्षी विवरण पत्र भरण्याला तीनदा मुदत वाढवून दिली गेली होती.

करोना लाटेमुळे करदात्यांना दोन महिन्यांची वाढीव मुभा

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी प्राप्तिकर विवरण पत्र भरण्यासाठी व्यक्तिगत करदात्यांना दोन महिन्यांचा वाढीव कालावधी यंदाही मिळणार आहे. गुरुवारी सरकारने ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने कंपन्यांना विवरण पत्र भरण्याची मुदतही ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे एका महिन्याने वाढविली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा दाहक परिणाम पाहता, करदात्यांना दिलासा म्हणून हे मुदतवाढीचे पाऊल टाकले असल्याचे कर मंडळाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पगारदार करदात्यांना विवरण पत्र भरण्यासाठी आवश्यक आणि नियोक्त्यांकडून दिले जाणाऱ्या ‘फॉर्म १६’ वितरित करण्याची अंतिम मुदतही आता १५ जुलै २०२१ अशी करण्यात आली आहे.

प्राप्तिकर कायद्याप्रमाणे, ज्यांच्या लेख्यांचे लेखापरीक्षण (ऑडिट) करणे आवश्यक नसते आणि जे ‘आयटीआर-१’ किंवा ‘आयटीआर-४’ या नमुना अर्जांचा वापर करून विवरण पत्र भरतात त्यांना व्यक्तिगत करदाते असे म्हटले जाते, त्यांना वाढीव दोन महिन्यांच्या मुदतीचा लाभ मिळेल.

करोनाच्या पहिल्या लाटेच्या परिणामामुळे गेल्या वर्षी विवरण पत्र भरण्याला तीनदा मुदत वाढवून दिली गेली होती. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विवरण पत्र भरण्यासाठी वापरात येणाऱ्या अर्जात या वेळी कोणतेही बदल केले गेलेले नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Deadline for filing income tax returns extended till september 30 akp

Next Story
अँकरचा बिगर इलेक्ट्रीक स्विच व्यवसायावर भर