मुंबई : सरलेल्या ऑक्टोबरमध्ये इक्विटी अर्थात समभागसंलग्न म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचा ओघ घसरून ९,३९० रुपयांवर सीमित राहिला. सप्टेंबरमध्ये या फंडातील प्रवाह १४,०७७ कोटी रुपयांवर होता. मात्र गुंतवणुकीचा सर्वतोमुखी पर्याय बनलेल्या नियोजनबद्ध गुंतवणूक अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून ऑक्टोबरमधील योगदान १३,००० कोटींच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया अर्थात ‘अ‍ॅम्फी’द्वारे जाहीर मासिक आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात १२,९७६ कोटी रुपये असलेल्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीने ऑक्टोबरमध्ये अभूतपूर्व १३,०४० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

चालू वर्षांत मे महिन्यापासून ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणारी गुंतवणूक १२,००० कोटी रुपयांच्या पुढे कायम आहे. मे महिन्यात १२,२८६ कोटी रुपये, जूनमध्ये १२,२७६ कोटी रुपये तर जुलै महिन्यामध्ये १२,१४० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. तर चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या महिन्यांत म्हणजेच एप्रिल २०२२ मध्ये ११,८६३ कोटी रुपयांचा ओघ आला होता. चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या सात महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी एकूण ८७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक  ‘एसआयपी’मार्फत केली आहे. मागील म्हणजेच २०२१-२२ या संपूर्ण आर्थिक वर्षांत एकूण १.२४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या माध्यमातून झाली होती.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली
Narendra Modi amit shah
केंद्र सरकार मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात CAA लागू करणार; सूत्रांची माहिती, पोर्टलही तयार
According to the credit rating agency the highest growth will be in the sale of svu eco news
‘एसयूव्ही’च्या विक्रीतच सर्वाधिक वाढ! पुढील आर्थिक वर्षासाठी ‘क्रिसिल’चे प्रवासी वाहन विक्रीचे अनुमान

देशातील ४३ म्युच्युअल फंड घराण्यांनी ऑक्टोबर महिन्यात इक्विटी अर्थात समभागसंलग्न फंडांमध्ये ९,३९३ कोटी रुपयांचे योगदान मिळविले. जे मासिक तुलनेत घटले असले तरी मार्च २०२१ पासून सलग २० व्या महिन्यात इक्विटी फंडांमधील ओघ सकारात्मक राहिला आहे. त्याआधी जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२१ या आठ महिन्यांत इक्विटी फंडांमधून ४६,७९१ कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला होता. याव्यतिरिक्त, गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडात (ईटीएफ) ऑक्टोबरमध्ये १४७ कोटी रुपयांचा ओघ दिसला, जो मागील महिन्यात ३३० कोटी रुपये होता.

 दुसरीकडे रोखेसंलग्न अर्थात डेट म्युच्युअल फंडांमधून सप्टेंबरमध्ये ६५,३७२ कोटींची गुंतवणूक आटली, त्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये निर्गुतवणुकीचे प्रमाण केवळ २,८१८ कोटी रुपयांवर सीमित राहिले. जेव्हा भांडवली बाजारात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांची नवीन शिखर स्थापणारी दौड सुरू असते तेव्हाच म्युच्युअल फंड गुंतवणूकदार नफा पदरी बांधून घेण्यासाठी समभागसंलग्न (इक्विटी) फंडांची विक्री करत असल्याचे यापूर्वीही दिसले आहे. सरलेल्या जुलै महिन्यात इक्विटी फंडांतील ओघ जवळपास निम्म्याने म्हणजे ४३ टक्कय़ांनी गडगडून ८,८९८ कोटी रुपयांवर सीमित राहिला होता. त्या आधीच्या जून, मे आणि एप्रिल अशा तीन महिन्यांत इक्विटी फंडांनी अनुक्रमे १५,४९५ कोटी रुपये, १८,५२९ कोटी रुपये आणि १५,८९० कोटी रुपयांची नक्त गुंतवणूक आकर्षित केली होती.