पीटीआय, नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षांतील सरलेल्या एप्रिल ते जुलै या कालावधीत सोने आयात ६.४ टक्क्यांनी वाढून १२.९ अब्ज डॉलरवर म्हणजेच सुमारे १ लाख कोटींवर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली. सोने आयात वाढल्याने देशाच्या चालू खात्यावरील तूट आणखी विस्तारण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच काळात १२ अब्ज डॉलर मूल्याच्या सोन्याची आयात करण्यात आली होती.

जगातील दुसरा मोठा सोन्याचा आयातदार देश असलेल्या भारतात, खनिज तेलानंतर आयात खर्चात सोन्याचा दुसरा मोठा वाटा आहे. सोने आणि खनिज तेलाचा आयात खर्चही अलीकडच्या काळात वाढला आहे. परिणामी जुलै २०२२ मध्ये देशात होणारी आयात आणि देशाकडून होणारी निर्यात यातील तफावत अर्थात व्यापार तूट विक्रमी ३० अब्ज डॉलरवर पोहोचली. गेल्या वर्षी याच महिन्यात (जुलै २०२१) ती १०.६३ अब्ज डॉलर होती.

infosys profit rs 7969 crore in fourth quarter
इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप
Navi Mumbai Municipal Corporation, Achieves, Record Property Tax, Collection, 716 Crore , financial year, 2023-2024,
नवी मुंबईत ७१७ कोटी मालमत्ता कर जमा, गतवर्षीपेक्षा ८३.६६ कोटी जास्त करवसुलीचा दावा

तथापि सरकारने सोने आयात कमी केली जावी यासाठी त्यावरील आयात शुल्कात वाढ केली. त्याचा परिणाम म्हणून जुलै महिन्यात सोन्याच्या आयातीत वार्षिक तुलनेत ४३.६ टक्क्यांनी घसरण होऊन ती २.३७ अब्ज डॉलपर्यंत खालावली. मागील वर्षीच्या याच महिन्यात ४.२ अब्ज डॉलरपेक्षा अधिक होती. दिलासा देणारी बाब म्हणजे, चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या चार महिन्यांत हिरे आणि दागिन्यांची निर्यात सुमारे ७ टक्क्यांनी वाढून १३.५ अब्ज नोंदण्यात आली.

सोने आयातीला लगाम

केंद्र सरकारने गेल्या महिन्यात सोन्यावरील मूळ सीमा शुल्क ७.५ टक्क्यांवरून वाढवत १२.५ टक्के केले. याचबरोबर २.५ टक्के कृषी पायाभूत विकास उपकर (एआयडीसी) लागू करण्यात आल्यामुळे सोन्यावरील एकूण आयात कराचा भार १५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

भारतीयांचे सोन्यावरील प्रेम जगजाहीर असून दरवर्षी ८०० ते ९०० टन सोने भारतीय खरेदी करतात. यामुळे सोने आयातीवर मोठय़ा प्रमाणावर परकीय चलन खर्च होत असते. वस्तूंवरील आयात कर वाढवणे हा आयातीला आळा घालण्याचा एक मार्ग आहे. यामुळे आयात करण्यात येणारी वस्तू अधिक महाग होत असल्याने त्याची मागणी कमी होण्यास मदत होते.