scorecardresearch

अभिनेते दिलीप प्रभावळकर ‘माधवबाग’चे सदिच्छा दूत

माधवबाग इन्स्टिटय़ूट ऑफ प्रीव्हेन्टिव्ह कार्डियॉलॉजी या संस्थेने सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.

जीवनशैलीचा आजार बनलेल्या हृदयरोगाला प्रतिबंधाबाबत जागृतीच्या प्रसारासाठी अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची माधवबाग इन्स्टिटय़ूट ऑफ प्रीव्हेन्टिव्ह कार्डियॉलॉजी या संस्थेने सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. माधवबागने आजार बळावण्याआधी ताण चाचणी व ईसीजीद्वारे निदान करण्याची आणि त्यायोगे पुढील मोठय़ा शस्त्रक्रिया व औषधोपचाराच्या खर्चापासून वाचण्यासाठी सुमारे लाखभर चाचण्यांचे उद्दिष्ट राखले आहे. हाच संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी दृक-श्राव्य, छापील आणि समाजमाध्यमांमध्ये प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका राहणार आहे. महाराष्ट्रात १२० हून अधिक चिकित्सालयांद्वारे माधवबागकडून या निदान चाचण्या केल्या जातात.

 

बदलापूरमध्ये आजपासून तीन दिवसांचे गृह-मालमत्ता प्रदर्शन
मुंबई: गेली २८ वर्षे प्रत्येकासाठी परवडणाऱ्या किमतीत घर हे ब्रीद घेऊन नवनवीन गृहप्रकल्पांसाठी अंबरनाथ-बदलापूरमध्ये अग्रेसर नाव राहिलेल्या पनवेलकर ग्रुपने पुन्हा एकदा मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशनचे आयोजन केले आहे. एकाच ठिकाणी मुंबई महानगर क्षेत्रातील विविध गृहप्रकल्पांबद्दल माहिती, सत्वर गृहकर्जाच्या सोयीसाठी वित्तीय संस्था आणि बँकांचे कक्ष अशी व्यवस्था असलेले हे प्रदर्शन बदलापूर (पूर्व) येथे ८ ते १० एप्रिल असे तीन दिवस सुरू राहील. पनवेलकर ग्रुपने केवळ १ टक्का अग्रिम रक्कम भरणा करून घराची नोंदणी करण्याच्या बाजारात आणलेल्या योजनेचा प्रदर्शनाला भेट देणाऱ्या घरइच्छुकांना लाभ दिला जाईल.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-04-2016 at 04:05 IST

संबंधित बातम्या