पुणे : सहकार क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता सभासदांना ४ टक्के लाभांश जाहीर केला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सनदी लेखापाल मिलिंद काळे यांनी दिली. कॉसमॉस बँकेला रिझव्‍‌र्ह बँकेकडून पुणे जिल्ह्यात शिरूर, राजगुरूनगर, वाघोली आणि अंबरनाथ येथे शाखा सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शाखा विस्ताराला बँकेने सुरुवात केली असून वाघोली आणि अंबरनाथ येथे लवकरच नवीन शाखा कार्यान्वित होणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष काळे यांनी सांगितले.