scorecardresearch

२८ फेब्रुवारीपर्यंत ‘हे’ काम करा पूर्ण, अन्यथा LIC मध्ये गुंतवणूक करू शकणार नाही

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ५ टक्के आणि पॉलिसीधारकांसाठी १० टक्के शेअर्स राखीव ठेवले आहेत.

LIC IPO
(फाइल फोटो इंडियन एक्सप्रेस )

LIC IPO : लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, देशातील सर्वात मोठी आणि जगातील तिसरी सर्वात मोठी विमा कंपनी, मार्च २०२२ मध्ये आपला आयपीओ (IPO) लॉन्च करू शकते. यासाठी एलआयसी प्राइस बँड २००० ते २१०० रुपयांपर्यंत ठेवू शकते. तुम्हालाही एलआयसीच्या आयपीओ मध्ये गुंतवणूक करायची असेल तर २८ फेब्रुवारीपूर्वी तुम्ही काही गोष्टी कराल्या हव्यात. जर तुम्ही ही कागदपत्रे पूर्ण केली नाहीत तर तुम्ही एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही.

पॅन अपडेट करा

एलआयसीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ५ टक्के आणि पॉलिसीधारकांसाठी १० टक्के शेअर्स राखीव ठेवले आहेत. तुम्ही देखील एलआयसीचे पॉलिसीधारक असाल, तर तुम्ही २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत एलआयसीच्या वेबसाइटवर तुमच पॅन कार्ड लिंक करून घ्यावं. २८ फेब्रुवारीपर्यंत तुमच्या पॉलिसीमध्ये पॅन लिंक न केल्यास, तुम्ही एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही.

गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते उघडा

एलआयसीने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, ज्यांना एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची आहे. त्यांनी लवकरात लवकर डीमॅट खाते उघडले पाहिजे. तुम्हालाही डिमॅट खाते उघडायचे असेल, तर तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन डीमॅट खाते उघडू शकता. याशिवाय, ऑनलाइन मोडद्वारे एनएसडीएल किंवा सीडीएसएलच्या वेबसाइटला भेट देऊन डीमॅट खाते उघडता येते.

पॅन तपशील कसे अपडेट करायचे?

यासाठी प्रथम एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

आता होमपेजवर ऑनलाइन पॅन नोंदणी पर्याय निवडा.

आता रजिस्ट्रेशन पेजवर प्रोसीडवर क्लिक करा.

नवीन पेजवर पॅन, ईमेल, मोबाईल नंबर आणि पॉलिसी नंबर अचूक भरा.

यानंतर कॅप्चा कोड बरोबर टाका.

आता ओटीपी रिक्वेस्ट वर क्लिक करा.

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.

आता OTP टाका आणि सबमिट करा.

यानंतर तुम्हाला यशस्वी नोंदणीचा ​​संदेश मिळेल.

जन्मतारीख, पॉलिसी-पॅन क्रमांकानुसार स्थिती पुन्हा एकदा तपासा.

अशाप्रकारे तुम्ही पॅन तपशील अपडेट कारु शकता.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Do this work till 28th february otherwise you will not be able to invest in lic ttg

ताज्या बातम्या