लोकांना चांगली फिक्स्ड पेन्शन मिळावी या उद्देशाने EPFO ​​आता नवीन पेन्शन योजना आखत आहे. नवीन योजनेअंतर्गत पेन्शनधारकांना रक्कम निवडण्याचा पर्याय असणार आहे. स्वयंरोजगार आणि खाजगी कर्मचाऱ्यांनाही यामध्ये नोंदणी करता येणार आहे. वेतन आणि उर्वरित सेवा कालावधीच्या आधारावर पेन्शनची रक्कम देखील निश्चित केली जाईल.

अधिक निवृत्ती वेतनाचा लाभ देण्याचा पर्याय उपलब्ध

सूत्रांच्या माहितीनुसार EPFO ​​नवीन फिक्स्ड पेन्शन योजना आणण्याच्या तयारीत आहे. फिक्स्ड पेन्शनची रक्कम दिलेल्या योगदानानुसार ठरवली जाईल. तुम्हाला हव्या असलेल्या पेन्शननुसार योगदान द्यावे लागेल. वास्तविक EPFO ​​कर्मचारी पेन्शन योजना-१९९५ च्या पर्यायाची तयारी करत आहे. EPS मधील सध्याची रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. पण, त्यात किमान पेन्शन खूपच कमी आहे. महिन्याच्या आधारावर मर्यादा फक्त १२५० रुपयांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत नोकरदार व्यक्तीला अधिक पेन्शनच्या सुविधेसाठी पर्याय देण्याची तयारी आहे.

free medical facility to employees on election duty
नागपूर: कर्मचाऱ्यांना नि:शुल्क उपचार, दिव्यांगांसाठी केंद्रावर व्हीलचेअर
Navi Mumbai Municipality Expands Waste Management Scope Introduces waste e Transportation Syste
नवी मुंबई : लवकरच कचऱ्याची ई-वाहतूक सुविधा, कचरा वाहतूक व संकलनासाठी अखेर निविदा प्रसिद्ध
Municipal Corporation will fill the contract semi-medical staff on a temporary basis
महानगरपालिका तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी निमवैद्यकीय कर्मचारी भरणार
post of Health Director City
‘आरोग्य संचालक शहर’ हे पद तीन वर्षांनंतरही कागदावरच, शहरी आरोग्याविषयी सरकार उदासीन…

EPS मध्ये कोणते नियम आहेत?

जेव्हा एखादा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) चा सदस्य बनतो, तेव्हा तो EPS चा देखील सदस्य होतो. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या १२ टक्के वाटा पीएफमध्ये जातो. कर्मचार्‍याव्यतिरिक्त समान भाग नियोक्त्याच्या खात्यात देखील जातो. परंतु नियोक्त्याच्या योगदानाचा एक भाग ईपीएस म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजनेत जमा केला जातो. EPS मध्ये मूळ वेतनाचे योगदान ८.३३ % आहे. तसेच पेन्शनपात्र पगाराची कमाल मर्यादा १५,००० रुपये आहे. अशा स्थितीत दरमहा जास्तीत जास्त १२५० रुपये पेन्शन फंडात जमा करता येतात.

सध्याच्या नियमांनुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार १५,००० रुपये किंवा त्याहून अधिक असेल, तर १२५० रुपये पेन्शन फंडात जमा केले जातील. जर मूळ वेतन १० हजार रुपये असेल तर योगदान फक्त ८३३ रुपये असेल. कर्मचार्‍याच्या निवृत्तीनंतरच्या निवृत्ती वेतनाची गणना देखील केवळ १५ हजार रुपये इतकी कमाल वेतन मानली जाते. अशा परिस्थितीत निवृत्तीनंतर कर्मचार्‍याला ईपीएस नियमानुसार जास्तीत जास्त केवळ ७,५०० रुपये पेन्शन मिळते.

पेन्शनची गणना कशी केली जाते?

EPS गणनेसाठी सूत्र = मासिक पेन्शन = (पेन्शनपात्र वेतन x EPS खात्यातील वर्षांच्या योगदानाची संख्या)/७०

जर एखाद्याचा मासिक पगार (गेल्या ५ वर्षांच्या पगाराची सरासरी) १५,००० रुपये आणि नोकरीचा कालावधी ३० वर्षे असेल, तर त्याला दरमहा केवळ ६,८२८ रुपये पेन्शन मिळेल.

मर्यादा काढून टाकल्यास तुम्हाला किती पेन्शन मिळेल?

जर १५ हजारांची मर्यादा काढून तुमचा पगार ३० हजार असेल तर तुम्हाला फॉर्म्युलानुसार (३०,००० X ३०)/७० = १२,८५७ रुपये पेन्शन मिळेल.