कर्माचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ईपीएफओकडून कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ईपीएफओमध्ये पैसे असणाऱ्या अनेकांना त्यांच्या प्रोव्हिडंट फंडावरील रकमेवर व्याज मिळवण्याची प्रतिक्षा आहे. या व्याजाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार दिवाळीआधीच दिवळी भेट देण्याच्या तयारीत आहे. सणासुदीच्या आधी म्हणजेच दिवाळीच्या आधीच केंद्राकडून ईपीएफओ खातेधारकांच्या खात्यावर ८.५ टक्क्यांच्या दराने व्याजाची रक्कम जमा केली जाते.

लाइव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सरकारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील तपशील दिलाय. सरकारकडून जेव्हा कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यावर महागाई भत्ता जमा केला जाईळ त्याचवेळी ईपीएफओ खात्यांवरही व्याज जमा केलं जाणार आहे.

Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक

नक्की वाचा >> प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी गुड न्यूज… लवकरच मिळणार घसघशीत पगारवाढ; IT कर्मचारी होणार मालामाल

ईपीएफओच्या केंद्रीय बोर्डाने ८.५ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने ८.५ टक्के व्याद देण्यासंदर्भात अर्थमंत्रालयाकडून मंजूरी मागितली आहे. लवकरच यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांच्या नेतृत्वाखालील अर्थमंत्रालयाकडून शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी ईपीएफओला केंद्रीय अर्थमंत्रालयाने ८.५ टक्के व्याजदराने रक्कम जमा करण्याची परवानगी दिल्यानंतर लगेचच हे पेसे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यावर जामा केले जाणार आहे.

ईपीएफओ ८.५ टक्के व्याज देत असून इतर अल्प मुदतीच्या योजनांपेक्षा ही टक्केवारी अधिक आहे. जनरल प्रोव्हिडंट फंड म्हणजेच जीपीएफ आणि पलब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफवरील व्याजदर हा ७.१ टक्के इथका आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेटवर ६.८ टक्क्यांनी व्याज दिलं जात आहे. ईपीएफओअंतर्गत पैसे असणाऱ्या लाभधारकांची एकूण संख्या सहा कोटींहून अधिक आहे. हे एकूण पैशांपैकी १५ टक्के इक्विटीमध्ये गुंतवतात आणि बाकी पैसे जमा केले जातात.

ईपीएफ आणि पीएफ बॅलेन्स कसा तपासावा?

चार प्रकारे तुम्हाला तुमच्या पीएफचा बॅलन्स तपासण्याची सोय आहे. ईपीएफओच्या वेबसाईटवर, ईपीओफओच्या अॅपवर, एसएमएसच्या माध्यमातून किंवा मिस कॉल देऊन.

– वेबसाईटवर बॅलन्स चेक करण्यासाठी https://epfindia.gov.in/site_en/index.php इथं भेट द्या. त्यासाठी तुमच्याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर अॅक्टिवेट केलेला असण्याची गरज आहे. हा क्रमांक ईपीएफओ देतं व एम्प्लॉयर तो अॅक्टिवेट करतो. नोकरी बदलली तरी हा युएएन क्रमांक बदलत नाही, तो कायम राहतो.
तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाइलच्या माध्यमातून तुम्ही या पोर्टलवर पासवर्ड सेट करू शकता आणि नंतर तिथं दिलेल्या सूचनांनुसार पासबुकच्या माध्यमांमधून पीएफ बॅलन्स चेक करू शकता.

– ईपीएफओचं अॅप प्ले स्टोअरमध्ये असून ते डाऊनलोड करून मेंबर लॉगइनच्या ऑप्शनमधून बॅलन्स चेक करायची सोय आहे. इथंही नोंदणी असलेल्या मोबाइलच्या माध्यमातून जोडणी केली जाते.

– केवायसी डिटेल्स पूर्ण झाले असतील तरच एसएमएसच्या माध्यमातून बॅलन्स जाणून घेता येतो. EPFOHO UAN ENG असा मेसेज टाइप करायचा ENG च्या जागी MAR टाइप केलं तर मराठीत माहिती मिळेल. आपला UAN त्यात टाकून हा मेसेज 7738-299-899

– नोंदणीकृत मोबाइलवरून 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यावर एसएमएस येतो आणि पीफच्या डिटेल्स तुम्हाला कळवल्या जातात.