पोलाद निर्मितीतील अग्रणी एस्सार स्टील लि.ने विदेशी कर्जरोख्यांच्या माध्यमातून १ अब्ज डॉलरचा निधी उभारण्याची घोषणा केली आहे. गेल्या दोन महिन्यात डॉलरच्या तुलनेत १० टक्क्यांनी अवनत झालेला रुपया पाहता सर्वाधिक जोखमीचा ठरणाऱ्या भांडवलीस्रोताचा पर्याय कंपनीने निवडला आहे. मात्र ही कर्ज उभारणी डॉलर डेट फंडाच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे या कर्जाची परतफेड डॉलररूपातच होणार आहे आणि कंपनीला त्यापायी होणारे उत्पन्नही डॉलरमध्येच असेल, ही बाब कंपनीच्या पथ्यावर पडणारी ठरेल.
शिवाय या कर्जाची मुदत सात वर्षे अशी दीर्घावधीची आहे. विदेशातील या प्रस्तावित कर्ज उभारणीतून रुपयांमधील नाना प्रकारच्या कर्जाची परतफेड करून, त्यांच्या व्याजापोटी होणाऱ्या खर्चात वार्षिक ४५० कोटी रुपयांची बचत होईल, असे कंपनीने म्हटले आहे.