वृत्तसंस्था, नवी दिल्ली : अमेरिकी डॉलर आणि युरोपीय महासंघाचे चलन असलेल्या युरोचे मूल्य हे २० वर्षांच्या कालावधीनंतर समान पातळीवर आले. युरोला या वर्षी तीव्र वेगाने भयंकर घसरणीचा सामना करावा लागला आणि त्याचीच परिणती म्हणजे ते बुधवारी आणखी कलंडत डॉलरच्या बरोबरीत येऊन बसले.

रशिया-युक्रेन युद्धाची संपूर्ण जगाला झळ पोहोचली असली तरी मुख्यत: युरोपीय देशांवर त्याचे सर्वाधिक प्रतिकूल परिणाम झाले आहेत. परिणामी चालू वर्षांत युरोचे मूल्य अमेरिकी डॉलरच्या तुलनेत तब्बल १२ टक्क्यांनी घसरले आहे. तर अस्थिर बनलेल्या जागतिक अर्थ-वातावरणांत, सुरक्षित आश्रय म्हणून गुंतवणूकदार जगतात डॉलरची महती वाढल्याने, अन्य सर्व जागतिक चलनांच्या तुलनेत ते उत्तरोत्तर मजबूत बनत आहे. त्यामुळे एक डॉलर आणि एक युरो यांचे विनिमय मूल्य एकसमान पातळीवर आले आहे.

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप
Increase in average life expectancy of Indians
भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ

अमेरिकेबरोबरच युरोपात देखील बहुतांश देशांमध्ये महागाईने नवीन उच्चांक गाठले आहेत. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यापासून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत युरोच्या मूल्य घसरणीला सुरुवात झाली. युरोपातील बहुतांश देश हे ऊर्जाविषयक गरज म्हणून नैसर्गिक वायूच्या पुरवठय़ासाठी रशियावर अवलंबून आहेत. मात्र रशियाचा युक्रेनवरील एकतर्फी हल्ला आणि त्याचा निषेध म्हणून रशियावर आलेले अनेक प्रकारचे निर्बंध हे प्रत्यक्षात युरोपच्या अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल परिणाम करणारे ठरले आहेत. ऊर्जा संकटामुळे युरोपातील महागाईने उच्चांकी पातळी गाठली आहे. तेथील मध्यवर्ती बँक – युरोपियन सेंट्रल बँकेने महागाईवर नियंत्रणासाठी २०११ नंतर प्रथमच व्याजदरात वाढीची घोषणा देखील केली आहे.

युरो हे सध्या युरोपातील १९ देशांचे आणि सुमारे ३४ कोटी लोकांकडून वापरात येणारे चलन आहे. १९९९ मध्ये सुरुवात केल्यापासून त्याने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. सुरुवातीच्या काळात कमकुवतपणामुळे हे चलन डॉलरच्या तुलनेत ८५ सेंटच्या खाली गेले होते. तर २००८ मध्ये ते एका युरोचे मूल्य १.६० डॉलपर्यंत मजबूत बनले होते.